Latur Crime-धक्कादायक घटना : प्राप्तिकर निरीक्षकाचा मुलाकडून खून; लातूर जिल्हा हादरला,

Hot Posts

6/recent/ticker-posts

Latur Crime-धक्कादायक घटना : प्राप्तिकर निरीक्षकाचा मुलाकडून खून; लातूर जिल्हा हादरला,

Latur Crime-धक्कादायक घटना : प्राप्तिकर निरीक्षकाचा मुलाकडून खून; लातूर जिल्हा हादरला, 


लातूर | प्रतिनिधी/रुपेश डोलारे:  आईसोबत सतत होणाऱ्या वादातून संतप्त झालेल्या मुलानेच वडिलांचा छातीत चाकू भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात घडली असून, या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. ही घटना खोपेगाव (ता. लातूर) येथे मंगळवारी (दि. ३) सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

खोपेगाव येथील कृष्णकुमार समुखराव (वय ५५) हे प्राप्तिकर विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत होते. मंगळवारी सकाळी कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांचे पत्नीशी घरगुती कारणावरून भांडण झाले. हा वाद सुरू असतानाच त्यांचा मुलगा शंतनू कृष्णकुमार समुखराव (वय २९) मध्ये पडला. यावेळी वडील-मुलामध्ये जोरदार वादावादी झाली.

कुटुंबातील इतर सदस्यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला; मात्र “आईसोबत सतत का भांडता?” या कारणावरून शंतनू रागाच्या भरात गेला. त्याने स्वयंपाकघरातील चाकू उचलून कृष्णकुमार यांच्या छातीत जोरात भोसकला. चाकू आरपार गेल्याने कृष्णकुमार हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.

त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सकाळच्या वेळेत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपी मुलगा शंतनू समुखराव याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments