तुळजापूर :एयरटेल कंपनी मोबाईल टॉवर वरील डि एल ए एस एफ प्लेट चोरी प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या, तामलवाडी पोलिसाची धडाकेबाज कारवाई-Tuljapur Tamalwadi Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर :एयरटेल कंपनी मोबाईल टॉवर वरील डि एल ए एस एफ प्लेट चोरी प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या, तामलवाडी पोलिसाची धडाकेबाज कारवाई-Tuljapur Tamalwadi Crime News

तुळजापूर :एयरटेल कंपनी मोबाईल टॉवर वरील डि एल ए  एस एफ प्लेट चोरी प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या  पोलिसांनी आवळल्या, तामलवाडी पोलिसाची धडाकेबाज कारवाई-


धाराशिव : तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील एयरटेल कंपनीच्या मोबाईल टॉवरवर नेटवर्क मिळावे यासाठी बसविण्यात आलेली एस इ एफ डि एल ए कार्डच्या साडे तीन लाख किंमतीच्या चोरी प्रकरणी उत्तर प्रदेशातील एका आरोपीला तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी पोलीसानी तांत्रिक पद्धतीचा वापर करत बेंबळी पोलीस ठाणे हद्दीतुन ताब्यात घेवून अटक केली आहे. सदरील आरोपी याने मराठवाड्यातील पाच ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे केलेले असल्याचे कबुली दिली आहे.

 तामलवाडी येथील एयरटेल कंपनी मोबाईल टॉवर वरील डि एल ए  एस एफ प्लेटची चोरी ७ जानेवारी रोजी अज्ञात चोरट्यानी केली होती.

 या चोरीच्या घटने प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानुसार सपोनि गोकुळ ठाकुर यांनी सहकाऱ्या सह तपास सुरू केला  धुव्र त्रिभुवन प्रसाद वय २५ रा भागदिवा ग्राम तहसील बारा जि प्रयागराज राज्य युपी व त्याचा साथीदार हे खोटे आधार कार्ड व लायसन्स जमा करून दोघे मोठ्या शहरांमधून भाड्याने गाड्या घेऊन दिवसभर मोबाईल टावर कुठे कुठे आहेत यांची टेहळणी करीत  नंतर रात्री महागड्या डि एल ए कार्ड प्लेटची चोरी करीत  असे.गुन्ह्याच्या तपासादरम्यान तात्रिंक पध्दतीने गुन्ह्यात वापरलेली चार चाकी वाहन व गुन्हा करण्यासाठी लागणारी साहित्य जप्त करण्यात आले आहे.गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा महाराष्ट्र राज्यामध्ये येणार असून तो आणखीन गुन्हे करण्याची शक्यता आहे त्यावरून सदर आरोपीचा शोध घेऊन तांत्रिक पुराव्याच्या आधारे  तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि गोकुळ ठाकुर सुरज नरवडे नितीन भोसले व पोलीस मित्र अमोल पाटील यानी सापळा रचला  तेव्हा आरोपी हा वैराग गौडगाव मार्गे बेबळी पोलीस स्टेशनच्या देवळाली गावच्या शिवारात आला असता  त्यास रंगेहाथ पकडून रात्री अटक केली.

    सदरची कारवाई पोलीस अधिक्षक रितु खोकर  अप्पर पोलीस अधीक्षक शफाकत अमना उप विभागीय पोलीस  अधिकारी डॉ निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि गोकुळ ठाकुर psi प्रदीप टेकाळे, hc संजय कलमदाने, सुरज नरवडे नितीन भोसले यानी पुर्ण केली

Post a Comment

0 Comments