चरित्र्याच्या संशयावरून महिलेस चाकूने मारहाण; जीवे मारण्याची धमकी ; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल--
धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील हंगरगा नळ तांडा येथे महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन कुटुंबातील सात जणांनी मिळून महिलेस शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादाय घटना घडली आहे.ही घटना दि,३० रोजी घडली. याप्रकरणी नळदृग पोलीस ठाण्यात सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून झालेली अधिक माहिती अशी की, आरोपी नामे-सुनिल खेरु चव्हाण, संजय खेरु चव्हाण, खेरु ठाकरु चव्हाण, सोनाबाई खेरु चव्हाण, सुनिल राठोड,मनिषा संजय राठोड, मिथुन खेरु चव्हाण, सर्व रा. हंगरगा नळ तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.30.01.2026 रोजी 15.00 वा. सु. इटकळ ते तुळजापूर जाणारे रोडलगत फिर्यादी नामे- पुजा सुनिल चव्हाण, वय 22 वर्षे, रा. हंगरगा नळ तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी चारित्र्यावर संशय घेवून गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाकुने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीची आई जनाबाई यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-पुजा चव्हाण यांनी दि.02.02.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे नळदुर्ग येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 189(2), 190, 191(2) (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास नळदृग पोलीस करत आहेत.

0 Comments