मतदान केंद्रावर मोबाईलला बंदी, शिस्त राखण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय-
धाराशिव : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत असलेल्या 8 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक त्यांची बिगुल वाजले आहे .१३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील एकूण 1308 मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे .ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक शांततापूर्ण आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेत शिस्त आणि मतदानाची गोपनीयता राखणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याने मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राचे आवारात मोबाईल फोन नेण्यास प्रशासनाने सक्त मनाई केली आहे .हा नियम केवळ मतदारांनाच नव्हे तर उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनाही लागू असणार आहे मतदान प्रक्रियेवर कोणताही अनुचित प्रकार पडू नये आणि मतदानाची गुप्तता भंग होऊ नये यामागचा मुख्य उद्देश आहे .मतदानासाठी येताना नागरिकांनी आपली मोबाईल फोन सोबत आणू नयेत जर आपण मतदान केंद्रात प्रवेश करताना कोणाकडे मोबाईल फोन आढळून आला तर त्यांना मतदान केंद्रात प्रवेश नाकारला जाईल .मतदारांनी गैरसोय टाळण्यासाठी या सूचनांची तंतोतंत पालन करावे अशी आवाहन निवडणूक यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.
निवडणुकीची तयारी पूर्ण
जिल्ह्यातील 8 पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या जागांसाठी होणारी ही निवडणूक लोकशाहीचा मोठा उत्सव मानला जात आहे .प्रशासनाने सर्व 1308 केंद्रावर आवश्यक सोयीसुविधा आणि कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी अधिकारी कर्मचारी सज्ज आहेत
निर्भयपणे मतदानाचे आव्हान
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक हा लोकशाहीचा सत्तेचा विकेंद्रीकरणाचा महत्त्वाचा टप्पा आहे त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक पात्र मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून या प्रक्रियेत सहभागी असे आव्हान जिल्हा प्रशासनाने केली आहे.

0 Comments