नळदुर्ग : आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून एक जणावर एकावर कोयत्याने हल्ला; जीवे ठार मारण्याची धमकी तुळजापूर तालुक्यातील घटना-
धाराशिव: आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून शिवीगाळ करत लाथा बुक्क्या तसेच कोयत्याने गंभीर मारहाण केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथे दिनांक 7 रोजी घडली या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात सुधाकर कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नागनाथ वैरागकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,आरोपी नामे-नागनाथ शिवशंकर वैरागकर, रा. होर्टी ता. तुळजापूर जि. धाराशिव, यांनी दि.07.02.2026 रोजी 18.30 ते 19.00 वा. सु. फिर्यादी नामे-सुधाकर शिवाजी कुंभार, वय 32 वर्षे, रा. होर्टी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुधाकर कुंभार यांनी दि.08.02.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे नळदुर्ग येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2),352, 351(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

0 Comments