चिवरी पंचायत समिती गणावर भाजपचे कमळ फुलले; माहिती कडून प्रवीण भोसले यांचा दणदणीत विजय-Chivari panchayat Samiti election

Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी पंचायत समिती गणावर भाजपचे कमळ फुलले; माहिती कडून प्रवीण भोसले यांचा दणदणीत विजय-Chivari panchayat Samiti election

चिवरी पंचायत समिती गणावर भाजपचे कमळ फुलले; महायुतीकडून प्रवीण भोसले यांचा दणदणीत विजय-


तुळजापूर: जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका दिनांक 7 रोजी पार पडल्या होत्या. त्याचा निकाल आज जाहीर झाला आहे यामध्ये तुळजापूर तालुक्यातील चिवरी पंचायत समिती गणातील भाजपाचे उमेदवार प्रवीण भोसले यांचा दणदणीत विजय झाला आहे. चिवरी पंचायत समिती गणना वर पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलले आहे. या अगोदर या गणावर  काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता होती. या गणामध्ये महायुती कडून प्रवीण भोसले तसेच महाविकास आघाडी कडून संजय भोसले तर अपक्ष उमेदवार संभाजी काळजाते हे निवडणूक लढवले होते. यामध्ये महाविकास आघाडी व अपक्ष उमेदवाराचा पराभव करत प्रवीण भोसले यांनी दणदणीत विजय मिळवला आहे .या विजयानंतर महायुती समर्थकांकडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.





Post a Comment

0 Comments