दुर्दैवी घटना :झोका खेळताना नऊ वर्षीय चिमुरडीचा गळ्याला फास लागून मृत्यू; माजलगावमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना-Beed News

Hot Posts

6/recent/ticker-posts

दुर्दैवी घटना :झोका खेळताना नऊ वर्षीय चिमुरडीचा गळ्याला फास लागून मृत्यू; माजलगावमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना-Beed News

दुर्दैवी घटना :झोका खेळताना नऊ वर्षीय चिमुरडीचा गळ्याला फास लागून मृत्यू; माजलगावमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना-Beed News

बीड / प्रतिनिधी:   झोका...लहानपणातील एक आवडीचं ठिकाण. लहानग्यांसह मोठ्यांनाही झोक्याबाबत वेगळंच आकर्षण असतं. मात्र हेच आकर्षण किंवा आनंद एखाद्याचा जीव घेऊ शकतो असा कधी कोणी विचारही केला नसेल. बीडच्या माजलगावातून अशीच एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

माजलगाव शहरातील खंडोबा मैदान परिसरात मंगळवारी एका नऊ वर्षीय चिमुरडीचा खेळता खेळता झोक्याचा फास लागून दुर्दैवी मृत्यू झाला. वृंदा समीर रुद्रवार असे या मृत मुलीचे नाव असून ती दुसऱ्या इयत्तेत शिकत होती. ३१ मार्च २०२६ रोजी महावीर जयंतीनिमित्त शाळेला सुट्टी असल्याने वृंदा घराच्या वरच्या मजल्यावर आपल्या धाकट्या बहिणीसोबत खेळत होती. झोका खेळण्यासाठी तिने खुर्चीचा आधार घेतला असता, अचानक पाय निसटल्याने खुर्ची सरकली आणि झोक्याचा दोर तिच्या गळ्याभोवती आवळला गेला. बराच वेळ मुलगी खाली न आल्याने आई तिला पाहण्यासाठी वर गेली असता हा हृदयद्रावक प्रकार उघडकीस आला. कुटुंबाने तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. खेळण्या-बागडण्याच्या वयात एका निष्पाप मुलीचा अशा प्रकारे अंत झाल्याने संपूर्ण माजलगाव शहरावर शोककळा पसरली असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments