/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> धाराशिव: श्रीपतराव भोसले जुनिअर कॉलेज येथे फिजिक्सवाला स्कॉलरशिप परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Hot Posts

धाराशिव: श्रीपतराव भोसले जुनिअर कॉलेज येथे फिजिक्सवाला स्कॉलरशिप परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धाराशिव:  श्रीपतराव भोसले जुनिअर कॉलेज येथे फिजिक्सवाला स्कॉलरशिप परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



धाराशिव : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करणारा फिजिक्सवाला (PW) क्लास धाराशिवमध्ये शिक्षण क्षेत्रात नवा अध्याय लिहित आहे. दिनांक २८ व २९ मार्च २०२६ रोजी श्रीपतराव भोसले जुनिअर कॉलेज, धाराशिव येथे इयत्ता ७ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या परीक्षेत तब्बल १५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून, संस्थेवरील वाढता विश्वास यावरून स्पष्ट झाला.

    या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या टॉपर विद्यार्थ्यांना फिजिक्सवाला क्लासतर्फे शिष्यवृत्ती म्हणून फीसमध्ये १० ते २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे.

    आजच्या स्पर्धात्मक युगात डॉक्टर व इंजिनियर होण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थी पाहत आहेत. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता बाहेरगावी जाण्याची गरज नसून धाराशिवमध्येच दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. फिजिक्सवाला क्लासने आपल्या दुसऱ्या वर्षात यशस्वी वाटचाल करत इयत्ता ११ वी व १२ वी नीट, आयआयटी व जेईई तसेच ८ वी ते १० वी फाउंडेशन कोर्ससाठी सर्वांगीण मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे. विशेष म्हणजे जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या जेईई परीक्षेत आठ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तसेच मे मध्ये होणाऱ्या एनईईटी (नीट) परीक्षेची तयारी देखील उत्तम रीतीने चालू आहे.


    या क्लासची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे प्रत्येक बॅचमध्ये मर्यादित विद्यार्थी संख्या, ऑफलाईन अध्यापनासह दररोज शंका निरसन, मल्टिपल लेव्हल स्टडी मटेरियल, डेली प्रॅक्टिस पेपर्स, प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष, आधुनिक स्मार्ट बोर्ड क्लासरूम, PW ॲपद्वारे लेक्चर रेकॉर्डिंग सुविधा, अनुभवी शिक्षकवर्ग, स्वतंत्र स्टडी रूम, बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली व एसएमएसद्वारे पालकांना माहिती, तसेच एसीयुक्त व प्रशस्त वर्गखोल्या यांचा समावेश आहे.

    या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे व उपमुख्याध्यापक प्रमोद कदम यांनी मार्गदर्शन केले. परीक्षा फिजिक्सवाला विभाग प्रमुख अरविंद भगत, सेंटर मॅनेजर बळीराम पवार, पर्यवेक्षक के. के. कोरके, एम. व्ही. शिंदे तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली.

    या उपक्रमासाठी संस्थाध्यक्ष सुधीर अण्णा पाटील, सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील, संस्थेचे सीईओ आदित्य पाटील व प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments