जिद्द चिकाटीच्या जोरावर अवघ्या २० वर्षाच्या अविनाश वाघमारे या तरुणांची पोलिस पदाला गवसणी-police Bharati Selection News

Hot Posts

6/recent/ticker-posts

जिद्द चिकाटीच्या जोरावर अवघ्या २० वर्षाच्या अविनाश वाघमारे या तरुणांची पोलिस पदाला गवसणी-police Bharati Selection News

जिद्द चिकाटीच्या जोरावर अवघ्या २० वर्षाच्या अविनाश वाघमारे या तरुणांची पोलिस पदाला गवसणी-police Bharati Selection News 


"""""""""""""""""""""""""""""""""""""""""

*प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कठोर परिश्रमांच्या जोरावर स्वप्न साकार.*

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- स्पर्धेच्या युगात यश मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते व आत्मविश्वास ढळू न देता जिद्द चिकाटीच्या जोरावर तालुक्यातील काक्रंबा येथील एका शेतकरी कुटुंबातील अवघ्या २० वर्षीय तरुणाने पोलिस पदाला गवसणी घालणि-या या यशस्वी झेप घेणाऱ्या या तरुणाची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली असून पोलीस खात्यातील या तरुणांच्या या याशाने स्वतःसह कुटुंब व गावाचं नाव उज्ज्वल केलं आहे. सर्वत्र कौतुक होत आहे.

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील शेतकरी अरविंद गणपत वाघमारे यांची घरची आर्थिक परिस्थिती तशीच बेताची शेती अवघी दोन एकर मात्र सातत्याने सुलतानी अस्मानी नैसर्गिक संकटामुळे शेतीतून काही उत्पन्न हाती लागत नसल्याने त्यांच्या समोर सतत मुलांचे शिक्षण कसं करायचं हा प्रश्न कायम होता घरात अठरा विश्व दारिद्रय त्यातच मुलगा अविनाश अरविंद वाघमारे यांनी तर लहानपणापासूनच शासकीय सेवेत नोकरी करण्याची मनाशी खुणगाठ बांधली व आपल्याला काही तरी मोठं होण्याचं स्वप्न मनात बाळगून त्याने अभ्यास शारीरिक तयारी यावर विशेष लक्ष केंद्रित केलं मात्र हे करत असताना त्याला अनेक अडचणी,आर्थिक चणचण अपयश आले .

तरीही त्याने हार न मानता दिवस-रात्र मेहनत,नियमित सराव ,अभ्यास,कठोर प्रशिक्षण व  स्वतःवर असलेला विश्वास न ढळू देता सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून नुकत्याच झालेल्या धाराशिव येथील पोलीस पदाच्या पहिल्याच प्रयत्नात हेडकॉन्स्टेबल पदाला गवसणी घालत परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलं आहे त्याच्या या यशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे त्याची ही कहाणी तरुणांसाठी प्रेरणादाई ठरत आहे. "कठोर परिश्रम व आत्मविश्वास दृढ असेल,तर कोणतंही स्वप्न अशक्य नाही," हा संदेश त्याच्या यशातून अधोरेखित झाला आहे.

पायाला दुखापत तरी ही हार मानली नाही, गत एक दोन महिन्यांपूर्वीच धाराशिव जिल्ह्यात विविध पदांसाठी पोलीस भरती पार पडली यामध्ये अविनाश वाघमारे यांनी हेडकॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज भरल्यानंतर प्रत्यक्षात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली मात्र याच दरम्यान दररोज सराव करत असताना ऐन भरतीच्या तोंडावर अविनाश च्या पायाला जबर दुखापत झाली होती मात्र यात ही त्यांनी हार न मानता व खचून न जाता पायाला दुखापत असताना ही पोलीस पदाच्या भरतीसाठी मैदानात उतरून ग्राऊंड मध्ये ३८ गुण तर लेखी परीक्षेत ६७ गूण मिळवून आईनं दररोज काम करून पैसे पुरवलेल्या कष्टाचं चीज करून दाखवलं आहे.

Post a Comment

0 Comments