अनाधिकृत बांधकामावरून वाद; युवकाला विटेने मारहाण, तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल-Dharashiv Crime News Today
तुळजापूर : तामलवाडी पोलिस ठाणे हद्दीत अनाधिकृत बांधकामावरून झालेल्या वादातून एका युवकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रजित सुर्यभान कदम (रा. कदमवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दि. १ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास कदमवाडी येथे ही घटना घडली. फिर्यादी गोरख मच्छिंद्र मोरे (वय ३५, रा. कदमवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी इंद्रजित कदम हा अनाधिकृत बांधकाम करत असताना फिर्यादीने त्यास याबाबत विचारणा केली.
याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच सिमेंटच्या विटेने वार करून गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेबाबत दि. ७ मार्च २०२६ रोजी गोरख मोरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून तामलवाडी पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 118(2) व 352 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

0 Comments