हृदय द्रावक - इराण शोकसागरात: मिनाबमध्ये १६५ विद्यार्थिनींना अखेरचा निरोप; हवाई हल्ल्यानंतर सामूहिक अंत्यसंस्कार-Iran US Israel Bar Daily Update

Hot Posts

6/recent/ticker-posts

हृदय द्रावक - इराण शोकसागरात: मिनाबमध्ये १६५ विद्यार्थिनींना अखेरचा निरोप; हवाई हल्ल्यानंतर सामूहिक अंत्यसंस्कार-Iran US Israel Bar Daily Update

हृदय द्रावक - इराण शोकसागरात: मिनाबमध्ये १६५ विद्यार्थिनींना अखेरचा निरोप; हवाई हल्ल्यानंतर सामूहिक अंत्यसंस्कार-Iran US Israel Bar Daily Update 


महाराष्ट्र प्रतिनिधी – रूपेश डोलारे

इराण–इस्रायल–अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इराणच्या दक्षिण भागातील मिनाब (होर्मोजगान प्रांत) येथे २८ फेब्रुवारी रोजी एका शाळेवर झालेल्या हवाई हल्ल्यात तब्बल १६५ विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. या निष्पाप मुलींना आज सामूहिकरित्या अखेरचा निरोप देण्यात आला. संपूर्ण शहर शोकसागरात बुडाले असून वातावरण अत्यंत शोकमग्न झाले आहे.

नमाज-ए-जनाजा अदा; हजारोंची उपस्थिती

हल्ल्यात मृत पावलेल्या विद्यार्थिनींचे पार्थिव शवपेट्यांमध्ये ठेवून ओळीनं मांडण्यात आले. त्यानंतर मोठ्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीत नमाज-ए-जनाजा अदा करण्यात आला. शहरातील मुख्य मैदान आणि मशिदींमध्ये हजारो लोक जमले होते. साश्रू नयनांनी नागरिकांनी आपल्या लेकरांना अखेरचा निरोप दिला.

शाळेचा बहुतांश भाग कोसळला

हवाई हल्ल्यामुळे शाळेची इमारत मोठ्या प्रमाणात कोसळली. बचाव पथकांनी अनेक तास ढिगारा हटवून शोधकार्य केले. मदत आणि बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर मृतांचा आकडा १६५ वर पोहोचल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. मृतांमध्ये प्राथमिक शाळेतील मुलींची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात आले.

शहरात बंद; काळ्या पट्ट्या बांधून निषेध

अंत्ययात्रेच्या दिवशी मिनाब शहरातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. नागरिकांनी काळ्या पट्ट्या बांधून हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. अनेक ठिकाणी शांततेसाठी मोर्चे काढण्यात आले तर मशिदींमध्ये विशेष प्रार्थना करण्यात आल्या. युद्धस्थितीमुळे शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

या घटनेमुळे संपूर्ण इराण हादरला असून आंतरराष्ट्रीय पातळीवरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. निष्पाप विद्यार्थिनींच्या मृत्यूने मानवतेलाच मोठा धक्का बसला आहे.

Post a Comment

0 Comments