सोशल मीडियावरील ‘लाईक-कमेंट’चा रक्तरंजित शेवट-अकुलखेडा (चोपडा) येथे विवाहित प्रियकराने प्रियसीची गोळ्या झाडून हत्या;Jalgaov Murder Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

सोशल मीडियावरील ‘लाईक-कमेंट’चा रक्तरंजित शेवट-अकुलखेडा (चोपडा) येथे विवाहित प्रियकराने प्रियसीची गोळ्या झाडून हत्या;Jalgaov Murder Crime News

सोशल मीडियावरील ‘लाईक-कमेंट’चा रक्तरंजित शेवट-अकुलखेडा (चोपडा) येथे विवाहित प्रियकराने प्रियसीची गोळ्या झाडून हत्या;त्यानंतर आत्महत्या — जळगाव जिल्हा हादरला-Jalgaov Murder Crime News 


जळगाव: सोशल मीडियावरील ओळख, ‘लाईक’ आणि ‘कमेंट’मधून सुरू झालेलं नातं अखेर दुहेरी हत्याकांडात परिवर्तित झाल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील अकुलखेडा (ता. चोपडा) येथे शनिवारी (दि. २८ फेब्रुवारी) उघडकीस आली. विवाहित प्रियकराने आपल्या विवाहित प्रेयसीच्या डोक्यात गावठी कट्ट्याने गोळी झाडून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


छातीवर गोंदलेलं प्रेम… आणि संशयाची ठिणगी

मृतांमध्ये देवानंद सुभाष धनगर (वय २६) आणि अनिता जगदीश पाटील (वय ३०) यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांची ओळख सुमारे चार-पाच वर्षांपूर्वी सोशल मीडियावर झाली होती. ओळख वाढत जाऊन त्यांचे प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. विशेष म्हणजे दोघेही विवाहित होते. या संबंधांमुळे देवानंदची पत्नी त्याला सोडून गेल्याची माहिती समोर आली आहे.

देवानंदने आपल्या छातीवर अनिताचा फोटो गोंदवला होता, यावरून त्याच्या प्रेमाची तीव्रता दिसून येत होती. मात्र, अलीकडे अनिताने त्याच्याशी संपर्क तोडल्याने तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला होता. याच रागातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.


चिमुकल्या मुलीने उघडला मृत्यूचा दरवाजा

घटनेच्या वेळी अनिताचे पती जगदीश पाटील हे आईला भेटण्यासाठी निमगव्हाण येथे गेले होते, तर मुले शाळेत होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास अनिताची मुलगी शाळेतून घरी परतली. घर आतून बंद असल्याने तिने लोखंडी दरवाजाच्या जाळीतून हात घालून कडी उघडली. घरात प्रवेश करताच रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आई पाहून ती घाबरली आणि मोठ्याने रडू लागली. तिने तत्काळ वडिलांना फोन करून माहिती दिली.

पती घरी परतल्यानंतर घरात दोघांचेही मृतदेह आढळून आले. देवानंदची ओळख सुरुवातीला पटली नव्हती, कारण पतीने त्याला कधीही पाहिले नव्हते.


गावठी कट्ट्यातून झाडल्या गोळ्या

देवानंद धनगर हा (MH 18 AM 0850) क्रमांकाच्या मोटरसायकलवरून अकुलखेडा येथे पोहोचला होता. घरात कोणी नसल्याची संधी साधून त्याने सोबत आणलेल्या गावठी कट्ट्याने अनिताच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर काही क्षणांतच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

घटनेनंतर परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


पोलिसांची तातडीची कारवाई

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मोटरसायकल व गावठी कट्टा जप्त केला असून, फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपास सुरू आहे.

या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, सोशल मीडियावरील संबंध आणि त्यातून निर्माण होणारे वैयक्तिक व कौटुंबिक तणाव किती भयंकर परिणाम घडवू शकतात, याचे हे भयावह उदाहरण ठरले आहे.



Post a Comment

0 Comments