कळंब : मोहा येथे राजकीय वादातून थरार – तरुणाचे अपहरण करून तलवार, रॉडने बेदम मारहाण; जीवे मारण्याची धमकी- पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल-Dharashiv Crime News Update

Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव  दि. 10 एप्रिल :
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मोहा येथे राजकीय वादातून एका तरुणाचे अपहरण करून त्याला तलवार, लोखंडी रॉड व काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपींमध्ये बाबासाहेब प्रभु मडके, सोमनाथ रामदास मडके, मिलिंद रमेश वरपे, विशाल रमेश वरपे आणि सुरेश भिमराव वरपे (सर्व रा. मोहा, ता. कळंब) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमर राजेंद्र मडके (वय 33, रा. मोहा) हे दि. 5 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कुंभार वस्तीच्या रस्त्यावर असताना आरोपींनी त्यांना जबरदस्तीने चारचाकी गाडी (क्र. एमएच 25 आर 6538) मध्ये बसवून नेले. त्यानंतर शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी तसेच तलवार, रॉड व काठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले.

या हल्ल्यात फिर्यादीच्या भावालाही लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी करण्यात आले. तसेच दोघांनाही जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, राजकीय वादातून हिंसाचाराचे गंभीर स्वरूप समोर आले आहे.

दरम्यान, फिर्यादी अमर मडके यांनी दि. 8 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून कळंब पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 140(4), 118(2), 118(1), 115(2), 189(2), 189(4), 191(2), 191(3), 190, 351(2) तसेच शस्त्र अधिनियम कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments