भीषण अपघातात केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा मृत्यू; महसूल विभागावर शोककळा-Kej Tahsildar Accident News
केज (बीड) – लातूर-अंबाजोगाई महामार्गावर आज सकाळी घडलेल्या भीषण कार अपघातात केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेणापूर फाट्याजवळ हा अपघात झाला असून, घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, तहसीलदार गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत होते. यावेळी त्यांची कार भरधाव वेगात असताना अचानक नियंत्रण सुटले आणि वाहन पलटी झाल्याने हा गंभीर अपघात घडला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, अपघाताच्या वेळी ते कारमध्ये एकटेच होते.
घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनातून गिड्डे यांना बाहेर काढून त्यांचा मृतदेह पुढील तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. सध्या पोलिसांकडून अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास सुरू आहे.राकेश गिड्डे हे तरुण, कार्यक्षम आणि जनतेत मिसळून काम करणारे अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे महसूल प्रशासनासह केज तालुक्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने सहकारी अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांमध्ये तीव्र दुःखाची भावना व्यक्त होत आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे केवळ प्रशासनच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्हा शोकसागरात बुडाला असून, सर्व स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

0 Comments