हृदयद्रावक :मंगळवेढा तालुक्यात एकाच कुटुंबातील आई आणि दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू-Mangalvedha News

Hot Posts

6/recent/ticker-posts

हृदयद्रावक :मंगळवेढा तालुक्यात एकाच कुटुंबातील आई आणि दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू-Mangalvedha News

हृदयद्रावक :मंगळवेढा तालुक्यात एकाच कुटुंबातील आई आणि दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू-Mangalvedha News 


सोलापूर: स्वयंपाकासाठी जळण आणण्यास गेलेल्या मातेसह दोन चिमुकल्याचा साठवण तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाला ही घटना मंगळवेढा तालुक्यातील खडकी येथे शुक्रवार दिनांक 24 एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.  वैशाली अनिल घोडके वय (३५) श्रेया अनिल घोडके वय (१२) आणि सोहम अनिल घोडके वैदः अशी मृतांची नावे आहेत या घटनेची मंगळवेढा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे मृताच्या नातेवाईकांनी मात्र हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की खडकी तालुका मंगळवेढा येथील वैशाली घोडके या शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आपल्या दोन मुलांसह गावच्या साठवण तलावाच्या ठिकाणी स्वयंपाकाच्या जळण आणण्यासाठी गेल्या होत्या सायंकाळी 6.15 वाजता वैशाली यांचे पती अनिल घरी आल्यानंतर मोठा मुलगा स्वप्निल याच्याकडे त्यांनी चौकशी केली असता त्यांनी तेही जळण आणण्यासाठी गेले असल्याचे सांगितले.

अनिल यांनी तलावाजवळ जाऊन त्यांचा शोध घेतला असता त्या ठिकाणी मुलांच्या चप्पल व घरातील प्लास्टिकची बादली दिसून आली आणि त्यांनी इतर नातेवाईकांसह बॅटरीने तलावाजवळ शोध घेत असताना रात्री साडेसात वाजता वैशालीचा मृतदेह तलावाच्या पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. याबाबत मंगळवेढा तालुका पोलिसांना फोन करून कळविण्यात आल्यानंतर रात्री अकरा वाजता पोलिसांनी वैशाली यांना पाण्याबाहेर काढून मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात आणले त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केली असता मयत झाल्याचे घोषित केले. दोन चिमुकल्यांचा मात्र रात्रभर शोध लागला नव्हता शनिवारी सकाळी पंढरपूरहुन आलेल्या बचाव पथकाने श्रेया घोडके व सोहम घोडके यांचे मृतदेह तलावातून बाहेर काढले त्यानंतर ते शवाविच्छेदनासाठी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले .

घडलेला प्रकार हा संशयास्पद असून वैशालीचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे मयत वैशालीचा मावस भाऊ हेमंत सोनवणे यांनी सांगितले की वैशाली हिच्या पतीला दारूचे व्यसन आहे अधून मधून त्यांच्यात वादावादी होत असेल याबाबत वैशाली हिने आम्हा नातेवाईकांना देखील कळवले होते घडलेल्या घटनेचा घटनाक्रम पाहता सर्व गोष्टी संशयास्पद आहेत पोलिसांनी संबंधित प्रकरणाचे चौकशी करून आत्महत्या प्रवर्त केल्याचा गुन्हा नोंद करावा अशी आमची मागणी असल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments