उमरग्यात तरुणीचा खून; पतीकडून पैशांसाठी गळा आवळून हत्या केल्याचा आरोप-Umerga Crime News Live

Hot Posts

6/recent/ticker-posts

उमरग्यात तरुणीचा खून; पतीकडून पैशांसाठी गळा आवळून हत्या केल्याचा आरोप-Umerga Crime News Live

दोन लाखांसाठी पत्नीचा गळा आवळून खून; उमरग्यात धक्कादायक घटना”; पतीकडून पैशांसाठी गळा आवळून हत्या केल्याचा आरोप-Umerga Crime News Live 


उमरगा (जि. धाराशिव) : उमरगा शहरातील डिग्गी रोड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, २२ वर्षीय तरुणीचा तिच्याच पतीने गळा आवळून खून केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत पलक दत्ता कांबळे (वय २२, रा. उजळंब ता. बसवकल्याण, जि. बीदर, कर्नाटक) ही सध्या उमरगा येथील अनुसया व्यंकट सूर्यवंशी यांच्या घरी राहत होती. दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.१९ वाजण्यापूर्वी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या प्रकरणातील आरोपी दत्ता शामराव कांबळे (वय २७) याने पलक हिच्याकडे तिच्या आईकडून दोन लाख रुपये आणण्याची वारंवार मागणी केली होती. हे पैसे कर्ज फेडण्यासाठी व दुचाकीचे दुकान सुरू करण्यासाठी लागणार असल्याचे सांगून तो तिला मानसिक त्रास देत होता, अशी माहिती समोर आली आहे.

पैशांच्या मागणीवरून झालेल्या वादातूनच आरोपीने पलक हिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी फिर्यादी केशव धनाजी शिंदे (वय ४३, रा. कुंभार पट्टी, उमरगा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ८० व ८५ अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीसांकडून आरोपीला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू असून, या घटनेचा सखोल तपास केला जात आहे.

Post a Comment

0 Comments