तुळजापूरमध्ये अपघातातील जखमी अनोळखी वृद्धेचा मृत्यू; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन-Tuljapur Crime

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूरमध्ये अपघातातील जखमी अनोळखी वृद्धेचा मृत्यू; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन-Tuljapur Crime

तुळजापूरमध्ये अपघातातील जखमी अनोळखी वृद्धेचा मृत्यू; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन-Tuljapur Crime 


तुळजापूर (प्रतिनिधी) :
तुळजापूर येथे अपघातात जखमी झालेल्या अंदाजे 65 वर्षीय अनोळखी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, तिची ओळख पटविण्यासाठी तुळजापूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर अनोळखी महिला अपघातात जखमी झाल्यानंतर तिला दि. 27 ऑक्टोबर 2025 रोजी 108 रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथून सरकारी रुग्णालय, धाराशिव येथे दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरू असताना दि. 31 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3.24 वाजता तिचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक 01/2026, कलम 194 भा.ना.सु. सं. अन्वये नोंद करण्यात आली आहे.

मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून, तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी माध्यमांद्वारे माहिती प्रसिद्ध केली आहे. सदर महिलेबाबत कोणालाही माहिती असल्यास तात्काळ 9607998715 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, महिलेची ओळख पटावी यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments