श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाची उज्वल निकालाची परंपरा कायम

Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाची उज्वल निकालाची परंपरा कायम

श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाची उज्वल निकालाची परंपरा कायम


धाराशिव  :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी–मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागून देखील श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने लातूर विभागात आपल्या दैदिप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असतानाही उल्लेखनीय यश संपादन करण्यात आले आहे.

    विज्ञान शाखेत एकूण 856 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी 832 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी 42 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेचा निकाल 97.43 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेत जाधव राज चंद्रजीत यांनी 96.17 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. कु. भगत सिद्धी अरविंद यांनी 95.00 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर निकम धैर्यशील कुमार यांनी 94.67 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

    कला शाखेत 188 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी 180 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 9 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेचा निकाल 95.74 टक्के आहे. कला शाखेत कु. चंदेले वैष्णवी विरेंद्रसिंह यांनी 92.33 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. कु. सय्यद सुमय्या अल्ताफ यांनी 84.50 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर पाटील देवदत्त सिताराम यांनी 83.00 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला आहे.

    वाणिज्य शाखेत 64 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी 61 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 8 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेचा निकाल 95.31 टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेत कु. उंबरे सृष्टी प्रदीप यांनी 86.83 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. कु. खांडवे आरती बालाजी यांनी 86.67 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर शेख सोफीयान अजीजुद्दीन यांनी 86.33 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला आहे.

    सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष सुधीर (अण्णा) पाटील यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले की, बोर्ड परीक्षेतील यशासोबतच संस्थेने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नवे उपक्रम सुरू केले आहेत. धाराशिव पॅटर्न विकसित करण्याच्या दृष्टीने नीट, जेईई व सीईटी परीक्षांच्या तयारीसाठी शहरात प्रथमच ‘फिजिक्सवाला’चे ऑफलाइन वर्ग सुरू करण्यात आले असून याचा विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंग प्रवेशासाठी चांगला फायदा होत आहे. तसेच एच.एस.सी. बोर्ड परीक्षेतील उत्कृष्ट निकालाची परंपरा विद्यालयाने कायम राखली असल्याचे त्यांनी नमूद केले.

    यावेळी सरचिटणीस प्रेमाताई सुधीर पाटील, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्रशासकीय अधिकारी एस. एस. देशमुख, प्राचार्य एन. आर. नन्नवरे, उपप्राचार्य एस. के. घार्गे, पर्यवेक्षक के. के. कोरके, पर्यवेक्षक एम. व्ही. शिंदे, फिजिक्सवाला विभाग प्रमुख ए. व्ही. भगत, फेनॉमेनाल बॅचचे प्रमुख एस. एस. सदाफुले तसेच सर्व प्राध्यापक, विषयप्रमुख व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments