महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेला प्रणव जाधव यांचा इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सन्मान-MPSC Exam Maharashtra News

Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेला प्रणव जाधव यांचा इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सन्मान-MPSC Exam Maharashtra News

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेला प्रणव जाधव यांचा इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सन्मान-MPSC Exam  Maharashtra News 

_________________________

इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुक्यातील मौजे देवसिंगा तुळ येथील रहिवाशी प्रणव नरसिंग जाधव यांनी MPSC मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत महाराष्ट्र राज्यात पप्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले त्या बद्दल इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने प्रणव जाधव यांचा शाल पुष्पहार श्रीफळ व पेढा भरवून सन्मान करीत शुभेच्छा दिल्या.देवसिंगा तुळ येथील प्रणव जाधव यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन करीत लोकसेवा आयोग परीक्षेत उज्वल यश संपादित करीत ग्रामीण भागातील मुले ही अशक्य ते शक्य करून दाखवतात हेच दाखवून दिले.लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्र राज्यात पहिला येण्याचा मान मिळवत सहाय्यक नगर रचनाकार श्रेणी -1 राजपत्रित अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचा यथोचित सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक जाधव गुरूजी बाभळगावकर, पत्रकार दिनेश सलगरे, अभय जाधव व मित्र परिवार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments