मौजे केशेगाव येथे ‘सोनाई ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’चा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ ( दिनेश सलगरे):-
तुळजापूर तालुक्यातील मौजे केशेगाव येथे ‘सोनाई ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ या नव्या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा गुरुवार, दि. २१ मे २०२६ रोजी मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला.ग्रामीण भागातील विद्यार्थी, युवक-युवती तसेच गावपातळीवर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा, त्यांनी निर्भीडपणे भाषण करता यावे आणि विविध कार्यक्रमांत प्रभावीपणे आपले विचार मांडता यावेत, या उद्देशाने माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण क्षीरसागर यांनी ‘सोनाई ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ सुरू करण्याचा संकल्प केला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मल्लिनाथ गावडे हे होते, तर उद्घाटक म्हणून गट विकास अधिकारी भिंगार दिवे यांनी उपस्थित राहून संस्थेचे उद्घाटन केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगिनाताई कांबळे (संस्थापक अध्यक्षा, आधुनिक लहुजी सेना), सुरेश आप्पा भिसे, सुधाकरभाऊ पाटोळे, किरण भाऊ कांबळे, सचिन घोडके, प्राचार्य संगमेश्वर जळकोटे, आशोक साखरे, किसन देडे, सर्वेश्वर पाटील, फिरोज मुजावर, केशव गायकवाड, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाचे कौतुक करताना, ग्रामीण युवकांसाठी भाषणकलेचे प्रशिक्षण अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले व संस्थेला शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन तुकाराम क्षीरसागर यांनी तर आभार प्रदर्शन कमलाकर क्षीरसागर यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिता, सागर, अजय, सतीश, समर्थ, आर्यन व आर्या यांनी विशेष परिश्रम घेतले.
-------------------------------------
चौकट:-
केशेगाव येथे ‘सोनाई ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’चा शुभारंभ.
----------------
ग्रामीण युवकांसाठी भाषणकलेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम.
--------------------
मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात उद्घाटन सोहळा.
------------------
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नेतृत्व गुण वाढवण्यावर भर.
---------------------

0 Comments