मौजे केशेगावच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक हुकीरे तर व्ह.चेअरमनपदी अशोक महाबोले यांची निवड

Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे केशेगावच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक हुकीरे तर व्ह.चेअरमनपदी अशोक महाबोले यांची निवड

मौजे केशेगावच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक हुकीरे तर व्ह.चेअरमनपदी अशोक महाबोले यांची निवड 


-------------------------------------------

 

इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापूर तालुक्यातील मौजे केशेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक लक्ष्मण हुकीरे यांची चेअरमनपदी तर व्हा चेअरमनपदी अशोक महाबोले यांची निवड झाली आहे 

तुळजापूर तालुक्यातील केशेगाव व देवसिंगा नळ या गावाच्या अंतर्गतच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा कारभार चालत असतो,यात शेकडो शेतकरी सभासद आहेत, सोसायटीच्या वतीने येणारे शेतकऱ्यांच्या योजना, माहिती, अर्थसहाय्य, पिक कर्ज,शेतीतल्या योजना याच सोसायटीच्या माध्यमातून सुरू आहे 

या अगोदर देवसिंगा येथील माजी चेअरमन निशा बाबुराव बिराजदार तर माजी व्हा चेअरमन इस्माईल फकीर यांनी कारभार पाहिला आहे 

दिनांक २ मे रोजी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सेक्रेटरी शशिकांत हांडगे,माळगे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली असुन नुतन चेअरमन अशोक हुकरे तर व्हा चेअरमनपदी अशोक महाबोले यांची निवड करण्यात आली आहे 

यावेळी उपसरपंच मल्लीनाथ महाबोले, नागनाथ पाटू,प्रदिप हुकीरे,मारुती पवार, शिवानंद भुजबळ,इस्माईल फकीर, राजकुमार हुकीरे, रमेश पाटु,महेबुब पठाण,गुंडुशा कोळी, लक्ष्मण सुतार, अरुण साखरे, राजकुमार शिवशेट्टी,सुशिलाबाई हुकीरे,सुनिल क्षीरसागर, विजयकुमार पाटू, शशिकांत हुकीरे, विद्यानंद हंद्राळे, विठ्ठल घंटे यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments