सुट्टीवर आलेल्या जवानाचा भीषण अपघातात मृत्यू; निळपण येथे ट्रक-दुचाकी धडक, गावावर शोककळा:-Kolhapur Indian Army Accident News

Hot Posts

6/recent/ticker-posts

सुट्टीवर आलेल्या जवानाचा भीषण अपघातात मृत्यू; निळपण येथे ट्रक-दुचाकी धडक, गावावर शोककळा:-Kolhapur Indian Army Accident News

सुट्टीवर आलेल्या जवानाचा भीषण अपघातात मृत्यू; निळपण येथे ट्रक-दुचाकी धडक, गावावर शोककळा:-Kolhapur Indian Army Accident News 


कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील निळपण येथे दि,३० रोजी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात भारतीय सैन्यातील 27 वर्षीय जवान गजानन नामदेव निकोडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. चार दिवसांच्या सुट्टीसाठी गावी आलेल्या जवानाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन निकोडे हे भारतीय सैन्यात कार्यरत होते. ते नुकतेच चार दिवसांपूर्वी सुट्टीवर आपल्या गावी आले होते. गुरुवारी कामानिमित्त ते कूरहुन येथे गेले होते. काम आटोपून दुपारी सुमारे 1.45 वाजता ते दुचाकीवरून आपल्या गावी परत येत असताना निळपण येथील वळणावर समोरून येणाऱ्या ट्रकशी त्यांची जोरदार धडक झाली.

हा अपघात अत्यंत भीषण होता. धडकेत निकोडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. स्थानिकांनी तत्काळ मदत करत त्यांना गारगोटी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

गजानन निकोडे हे 2019 साली भारतीय सैन्यात भरती झाले होते. कर्तव्यदक्ष आणि शांत स्वभावाचे म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे निळपणसह परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. जवानाच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Post a Comment

0 Comments