खुशखबर लाडक्या बहिणींना मार्च एप्रिल चे ३००० हजार रुपये मिळणार-Mazi Ladki Bhahin Yojna
मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती घटकातील महिलांच्या थकीत मानधनासाठी 730 कोटी 51 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली असून याबाबतचा अधिकृत शासन निर्वीणय २० मे रोजी जारी करण्यात आला आहे. यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे रखडलेले मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचे एकूण तीन हजार रुपये थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .लाडकी बहिणी या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी सरकारकडून ई केवायसी बंधनकारक करण्यात आली होती. यासाठी 30 एप्रिल ची मुदत देण्यात आली होती या प्रक्रियेत राज्यातील तब्बल 1 कोटी 89 लाख लाडक्या महिन्यांची केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली आहे मात्र त्रुटी आणि केवायसी न केल्यामुळे तब्बल 54 लाख महिलांना या योजनेतून तात्पुरते वगळण्यात आले आहे .ही पडताळणी सुरू असल्यामुळेच गेल्या दोन महिन्यापासून बहिणींचे पैसे रखडले होते.

0 Comments