वडगाव काटी शिवारात तरुणावर जीवघेणा हल्ला ; अडीच तोळ्याची सोन्याची चैन हिसकावल्याचा आरोप-Tamalwadi Police Station Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

वडगाव काटी शिवारात तरुणावर जीवघेणा हल्ला ; अडीच तोळ्याची सोन्याची चैन हिसकावल्याचा आरोप-Tamalwadi Police Station Crime News

वडगाव काटी शिवारात  तरुणावर जीवघेणा हल्ला ; अडीच तोळ्याची सोन्याची चैन हिसकावल्याचा आरोप-Tamalwadi Police Station Crime News 


धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील वडगाव काटी शिवारात जुन्या वादातून एका तरुणासह त्याच्या भावावर मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. तसेच फिर्यादीच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तामलवाडी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र काळे, मनोज भानुदास काळे, सुखदेव भानुदास काळे, श्रीकांत काळे आणि सचिन काळे, सर्व रा. वडगाव काटी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 1 मे 2026 रोजी रात्री 10.20 वाजण्याच्या सुमारास गट नं. 45 मध्ये वडगाव काटी शिवारात फिर्यादी पंकज संतोष धावणे (वय 30) व त्यांच्या भावास अडवून शिवीगाळ केली. त्यानंतर गैरकायद्याची मंडळी जमवून लाथाबुक्क्यांनी तसेच काटीने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची चैन काढून घेतली तसेच “जिवे ठार मारू” अशी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणी फिर्यादी पंकज धावणे यांनी दि. 19 मे 2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 119(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 189(2), 191(2), 191(3), 190 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास तामलवाडी पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments