दुर्दैवी घटना : रोटाव्हेटवर पडून विद्यार्थ्यांचा मृत्यू नांदेड जिल्ह्यातील घटना-Nanded District Incident Accident News

Hot Posts

6/recent/ticker-posts

दुर्दैवी घटना : रोटाव्हेटवर पडून विद्यार्थ्यांचा मृत्यू नांदेड जिल्ह्यातील घटना-Nanded District Incident Accident News

 दुर्दैवी घटना : रोटाव्हेटवर पडून विद्यार्थ्यांचा मृत्यू नांदेड जिल्ह्यातील घटना-Nanded District Incident Accident News 

नांदेड : लोहा तालुक्यातील नांदगाव येथील एक नववी पास शाळकरी विद्यार्थ्यांचा रोटावेटर वर पडून मंगळवार दिनांक 19 रोजी सकाळी साडेअकरा वाजता सुमारास अपघातात गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्याचा रात्री उशिरा दुर्दैवी मृत्यू झाला. माधव प्रकाश भरकडे वय 15 असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून माधव हा शेजारच्या शेतात ट्रॅक्टर द्वारे रोटावेटरने मशागत सुरू असताना पाहून तिथे गेला होता यावेळी ट्रॅक्टरच्या मागील बाजूने चढण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा पाय घसरला आणि थेट रोटावेटर वर पडला या अपघातात तो गंभीर जखमी झाला याच वेळी नातेवाईक व स्थानिक शेतकऱ्यांनी उपचारासाठी नांदेड मधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र दुर्दैवाने रात्री उशिरा उच्चार दरम्यान माधवचा अखेर मृत्यू झाला .

मृतदेहाची उत्तरीर तपासणी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आली असून बुधवार दिनांक 20 मे रोजी मयत माधव भरकडे यांच्या पार्थिवावर नांदगाव येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे हा मुलगा आई-वडीला एकुलता एक आहे .मारतळा येथील श्री साईबाबा हायस्कूल मध्ये नुकताच नवी उत्तीर्ण झाला होता त्याच्या पश्चात आई-वडील व तीन बहिणी असा परिवार आहे या दुर्दैवी घटनेमुळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments