इशारा दिला आणि काम झाले! शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश; काक्रंबा–होनाळा रस्त्यावर गतिरोधक उभारले-Itkal Live News Update

Hot Posts

इशारा दिला आणि काम झाले! शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश; काक्रंबा–होनाळा रस्त्यावर गतिरोधक उभारले-Itkal Live News Update

इशारा दिला आणि काम झाले! शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश; काक्रंबा–होनाळा रस्त्यावर गतिरोधक उभारले-Itkal Live News Update 


""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

वाहनांच्या वेगाला लगाम; अपघात टाळण्यासाठी प्रशासनाची तातडीची कारवाई.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- "जे बोलतो ते करून दाखवतो, जे शक्य होईल ते नक्की करतो," या भूमिकेची प्रचिती देत तुळजापूर तालुका शिवसेना सोशल मीडिया प्रमुख चेतन बंडगर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. त्यांच्या मागणीनुसार काक्रंबा–होनाळा मार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक (स्पीड ब्रेकर) उभारण्यात आले असून, यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.काक्रंबा–होनाळा रस्त्यावर वाहनांचा वाढता वेग आणि त्यामुळे अपघाताची निर्माण होणारी शक्यता लक्षात घेऊन चेतन बंडगर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) उपअभियंत्यांना लेखी निवेदन सादर करून तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती. तसेच, मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.या इशाऱ्याची आणि मागणीची संबंधित विभागाने तात्काळ दखल घेत आवश्यक ठिकाणी गतिरोधक उभारण्याचे काम पूर्ण केले. त्यामुळे आता वाहनांच्या वेगावर नियंत्रण येण्यास मदत होणार असून भविष्यात होणाऱ्या छोट्या-मोठ्या अपघातांना मोठ्या प्रमाणात आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.रस्त्यावर गतिरोधक उभारण्यात आल्याने बेफाम वाहनचालकांवर नियंत्रण येईल, तसेच पादचारी, शालेय विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

या कामाबद्दल काक्रंबा परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे तसेच सातत्याने पाठपुरावा करणारे शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर यांचे आभार मानले आहेत."सुरक्षित रस्ता – सुरक्षित प्रवास" या उद्देशाने करण्यात आलेली ही कार्यवाही नागरिकांसाठी दिलासादायक ठरत असून, लोकहिताच्या प्रश्नांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे हे एक सकारात्मक उदाहरण असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments