मौजे केशेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवा संघटनेचे तालुका अध्यक्ष चनाप्पा साखरे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

Hot Posts

मौजे केशेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवा संघटनेचे तालुका अध्यक्ष चनाप्पा साखरे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

मौजे केशेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवा संघटनेचे तालुका अध्यक्ष चनाप्पा साखरे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश


""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

चनाप्पा साखरे यांच्या प्रवेशाने ग्रामीण भागात भाजपाचे पारडे जड.

"""""""""""""""'"""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुक्यातील मौजे केशेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवा संघटनेचे तालुका अध्यक्ष चनाप्पा साखरे यांचा भारतीय जनता पार्टीत असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश. भारतीय जनता पार्टी च्या विकासवादी विचारावर विश्वास ठेवत साखरे यांनी प्रवेश केला असल्याचे सांगितले. तुळजापुर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानी सोमवार दि.१३ जुलै २०२६ रोजी नूतन भाजपा सदस्याचा प्रवेश मोठ्या उत्साहात पार पडला. मौजे केशेगावं येथील शिवा संघटनेचे तालुका अध्यक्ष चनाप्पा साखरे व माजी उपसरपंच दयानंद जळकोटे यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश केला यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भव्य सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम सभापती सिद्धेश्वर कोरे, भाजपा गट प्रमुख तथा सरपंच मल्लिनाथ गावडे, युवा उद्योजक रामराजे पाटील, शिव हुक्किरे यांच्यासह बहुसंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते चनापा साखरे यांच्या भाजपा पक्ष प्रवेशामुळे शहापूर गटात निश्चितच भाजपाला मोठे बळ मिळणार असल्याचे सर्व सामान्य नागरिकातून बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments