/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> परंडा: एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल-Crime News

Hot Posts

परंडा: एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल-Crime News

परंडा:  एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल-Crime News 



मोटारसायकल बससमोर आडवी लावून शिवीगाळ, धक्काबुक्की व जीवे मारण्याची धमकी; परंडा पोलिसांत गुन्हा

परंडा (प्रतिनिधी) : परंडा तालुक्यातील पिंपरखेड शिवारात एसटी बस अडवून चालक व वाहकाला शिवीगाळ, धक्काबुक्की व मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामा भुजंग ठवरे (रा. कौडगाव, ता. परंडा, जि. धाराशिव) याच्याविरुद्ध हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना दि. 21 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6.45 वाजता पिंपरखेड पाटीजवळील पिंपरखेड शिवारात घडली.

फिर्यादी आण्णा माधव कोळी (वय 38, व्यवसाय – वाहक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, परंडा आगार, रा. कावळेवाडी, ता. जि. धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने एमएच-20 बीएल-4230 क्रमांकाच्या एसटी बससमोर स्वतःची एमएच-45 एक्स-2177 क्रमांकाची मोटारसायकल विनाकारण आडवी लावून बस अडवली. त्यानंतर चालक तात्यासाहेब बापू पिंगळे आणि वाहक आण्णा कोळी यांच्याशी शिवीगाळ करत धक्काबुक्की व मारहाण केली. तसेच "तुला बघून घेतो" अशी धमकी देत एसटी कर्मचाऱ्यांच्या शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी फिर्यादी आण्णा कोळी यांनी दि. 22 जुलै 2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून परंडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 132, 126(2), 115(2), 352 व 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास परंडा पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments