/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> धाराशिव एलसीबीची मोठी कारवाई; कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या १० जनावरांची सुटका, ₹१८.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त-Dharashiv Local Crime Branch Action News

Hot Posts

धाराशिव एलसीबीची मोठी कारवाई; कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या १० जनावरांची सुटका, ₹१८.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त-Dharashiv Local Crime Branch Action News

 

धाराशिव एलसीबीची मोठी कारवाई; कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या १० जनावरांची सुटका, ₹१८.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त-Dharashiv Local Crime Branch Action News

धाराशिव, प्रतिनिधी : धाराशिव जिल्ह्यात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करून कत्तलीसाठी नेणाऱ्या दोघांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत १० जनावरांची सुटका केली आहे. या कारवाईत जनावरे व दोन वाहने असा एकूण ₹१८ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघांविरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणणे तसेच अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, आळणी चौक परिसरात गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अशोक लेलँड टेम्पो (क्र. MH-25-AJ-6586) आणि पिकअप वाहन (क्र. MH-25-P-4259) यामधून जर्सी गायी कत्तलीसाठी येडशीकडून धाराशिवकडे नेल्या जात आहेत.

मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने आळणी चौक येथे सापळा रचला. दुपारी सुमारे १.३० वाजता संशयित दोन्ही वाहने आढळून आल्यानंतर त्यांना थांबवून चालकांची चौकशी करण्यात आली. त्यांनी आपली नावे दशरथ शंकर जगदाळे (वय ५२, रा. हिवरा, ता. भूम) आणि बालाजी भिकाजी सोनवणे (वय ३८, रा. भोनगिरी, ता. भूम) अशी सांगितली.

पोलीसांनी दोन्ही वाहनांची तपासणी केली असता, त्यामध्ये ८ गायी व २ वासरे अत्यंत अमानुष पद्धतीने, पुरेशी हालचाल करता येणार नाही अशा अवस्थेत बांधून वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. या जनावरांची अंदाजे किंमत ₹३.०५ लाख असून, दोन वाहनांसह एकूण ₹१८.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपी दशरथ शंकर जगदाळे आणि बालाजी भिकाजी सोनवणे यांच्याविरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखरअपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली सपोनि अश्विन जाधव, पोलीस हवालदार समाधान वाघमारे, महिला पोलीस हवालदार शोभा बांगर, पोलीस नाईक अशोक ढगारे, चालक पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड, केदार शेरखाने तसेच पोलीस मुख्यालयातील QRT पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली

Post a Comment

0 Comments