मयत आजोबांना 'जिवंत' दाखवून शेतजमिनीची परस्पर विक्री; परंडा दुय्यम निबंधक कार्यालयातील धक्कादायक फसवणूक उघड, ४ जणांवर गुन्हा-Paranda Police Station Fraud Crime News
परंडा (विशेष प्रतिनिधी):
आपले आजोबा मयत झाल्याचे माहित असतानाही, आरोपींनी संगनमत करून मयत व्यक्ती आणि मुख्य आरोपी एकच असल्याचे भासवले. इतकेच नव्हे तर थेट महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये (Gazette) नाव बदलून सोलापूरच्या एका नागरिकाच्या आजोबांच्या नावावर असलेली परंडा तालुक्यातील जवळा (नि.) शिवारातील शेतजमीन परस्पर लाटल्याचा आणि तिची विक्री केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात जालना आणि धाराशिव जिल्ह्यातील चार जणांविरुद्ध फसवणूक आणि बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे:
१) महंमद इसा हबीब (रा. ताडकळस, ता. भोकरदन, जि. जालना)
२) अली सय्यद कादरी (रा. जवळा नि., ता. परंडा, जि. धाराशिव)
३) भागवत नामदेव गवारे (रा. जवळा नि., ता. परंडा, जि. धाराशिव)
४) अदील अली कादरी (रा. जवळ नि., ता. परंडा, जि. धाराशिव)
२) अली सय्यद कादरी (रा. जवळा नि., ता. परंडा, जि. धाराशिव)
३) भागवत नामदेव गवारे (रा. जवळा नि., ता. परंडा, जि. धाराशिव)
४) अदील अली कादरी (रा. जवळ नि., ता. परंडा, जि. धाराशिव)
काय आहे नेमके प्रकरण?
या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी हमीद हारुण अरब (वय ४२ वर्षे, मूळ रा. जवळा नि., ता. परंडा, सध्या रा. सत्याईनगर, द. सोलापूर) यांचे आजोबा 'हबीब अल्वीविन महम्मद अरब' हे मयत झालेले आहेत. आपले आजोबा मयत झाले आहेत ही बाब सर्व आरोपींना पूर्णपणे माहित होती. असे असतानाही आरोपींनी कट रचून फिर्यादीच्या आजोबांची जमीन हडप करण्याचा बेत आखला.
मुख्य आरोपी महंमद इसा हबीब आणि फिर्यादीचे मयत आजोबा हे दोघे एकच व्यक्ती आहेत, असा बनाव आरोपींनी रचला. या बनावाच्या आधारे त्यांनी थेट महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत राजपत्रामध्ये (Gazette) नाव बदलून घेतले.
निबंधक कार्यालयात दस्तऐवजांची फेरफार
हा बनाव पूर्ण केल्यानंतर आरोपींनी परंडा येथील दुय्यम निबंधक कार्यालय गाठले. दुपारी १३:०० ते १६:०० वाजेच्या सुमारास खरेदी-विक्रीची प्रक्रिया पार पडली. फिर्यादीच्या आजोबांच्या नावावर जवळा नि. शिवारात शेत गट नंबर १३०७ मध्ये सामायिक क्षेत्र ८९ आर जमीन आहे. त्यापैकी आजोबांच्या हिश्श्याला येणारे १४.८३ आर क्षेत्र इतर कोणत्याही कायदेशीर वारसदारांची किंवा लोकांची सहमती व परवानगी न घेता, नमूद आरोपींच्या समक्ष खरेदी खत करून परस्पर विकून टाकले आणि फिर्यादीची मोठी कायदेशीर व आर्थिक फसवणूक केली.
भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंद
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी हमीद अरब यांनी तात्काळ परंडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर प्रथम खबर (FIR) दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून परंडा पोलिसांनी आरोपींविरुद्ध अत्यंत गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये:
- कलम ३१८(४): फसवणूक (Cheating)
- कलम ३३६(३): बनावट दस्तऐवज खरे भासवून वापरणे
- कलम ३४०(२): बनावटीकरण (Forgery)
- कलम ३(५): सामूहिक हेतूने (संगनमताने) केलेला गुन्हा
शासकीय यंत्रणेची दिशाभूल करून आणि मयत व्यक्तीला जिवंत दाखवून शासकीय राजपत्राचा गैरवापर केल्यामुळे परंडा आणि सोलापूर परिसरात या भू-माफियांच्या कारनाम्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास परंडा पोलीस करत असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

0 Comments