मौजे इटकळ येथील सुगलाबाई महांतय्या स्वामी यांचे अल्पशा आजाराने निधन.
---------------------------------------
इटकळ :(प्रतिनिधी):- मौजे इटकळ येथील रामभक्त नागनाथ स्वामी यांच्या मातोश्री श्रीमती सुगलाबाई महांतय्या स्वामी (वय ९४) यांचे अल्पशा आजाराने गुरुवार दि. २० ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने स्वामी कुटुंबीयांसह नातेवाईक व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
स्व. सुगलाबाई स्वामी या अत्यंत मनमिळाऊ, प्रेमळ व आपुलकीच्या स्वभावाच्या होत्या. आपल्या प्रेमळ वागणुकीने त्यांनी सर्वांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईक व परिचितांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मौजे इटकळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.स्व. सुगलाबाई स्वामी यांच्या पश्चात रामभक्त नागनाथ स्वामी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रकांत स्वामी व प्रकाश स्वामी यांच्यासह तीन मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने स्वामी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या प्रेमळ व ममत्वपूर्ण आठवणी सदैव स्मरणात राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व स्वामी परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.

0 Comments