/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> मौजे आरबळी शाळा समितीच्या अध्यक्षपदी कुमार भोसले, उपाध्यक्षपदी रसिद नदाफ यांची बिनविरोध निवड.

Hot Posts

मौजे आरबळी शाळा समितीच्या अध्यक्षपदी कुमार भोसले, उपाध्यक्षपदी रसिद नदाफ यांची बिनविरोध निवड.

मौजे आरबळी शाळा समितीच्या अध्यक्षपदी कुमार भोसले, उपाध्यक्षपदी रसिद नदाफ यांची बिनविरोध निवड.

--------------------------------------

इटकळ (दिनेश सलगरे):- मौजे आरबळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी कुमार भोसले, तर उपाध्यक्षपदी रसिद नदाफ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शाळेच्या बैठकीत सर्व सदस्यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या व शांततापूर्ण वातावरणात पार पडली.शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ गायकवाड यांनी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडीची घोषणा केली. यावेळी नवनिर्वाचित समितीमध्ये गणेश पवार, त्रिंबक भोसले, तानाजी झांबरे, विकास भोसले, गोरोबा पवार, महादेव इटकळे, आरती उबाळे, सारिका भोसले, मौलनबी नदाफ, हसीना पिंजारी, तसेच अंगणवाडी सेविका रंजना भोसले व आशा कार्यकर्त्या सरोजा पवार यांचा समावेश आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, भौतिक व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच पालक, शिक्षक आणि ग्रामस्थ यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करून शाळेच्या प्रगतीसाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

ही निवड प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ गायकवाड, सहशिक्षक नागेश स्वामी व रूपाली स्वामी यांनी परिश्रम घेतले. निवडीनंतर नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले.“शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी पारदर्शकपणे व सर्वांना विश्वासात घेऊन काम करू,” असा विश्वास नूतन अध्यक्ष कुमार भोसले व उपाध्यक्ष रसिद नदाफ यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>