/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> नळदुर्ग :जुनी ट्रॅव्हल्स बस देण्याच्या बहाण्याने १७.७१ लाखांची फसवणूक; तुळजापूर तालुक्यातील घटना-Fraud Complaint Naldurg Police Station News

Hot Posts

नळदुर्ग :जुनी ट्रॅव्हल्स बस देण्याच्या बहाण्याने १७.७१ लाखांची फसवणूक; तुळजापूर तालुक्यातील घटना-Fraud Complaint Naldurg Police Station News

 नळदुर्ग :जुनी ट्रॅव्हल्स बस देण्याच्या बहाण्याने १७.७१ लाखांची फसवणूक; तुळजापूर तालुक्यातील घटना-Fraud Complaint Naldurg Police Station News 


तुळजापूर प्रतिनिधी : तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील महिलेची जुनी ट्रॅव्हल्स बस देण्याचे आमिष दाखवून तब्बल १७ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी विनोद विष्णु मुंडे (रा. परळी वैजनाथ, जि. बीड, सध्या रा. फ्लॅट क्र. १०५, वासुदेव हाईट्स, कुटे मळा, मानाजी नगर, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दि. ९ नोव्हेंबर २०२५ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत फिर्यादी उषा पुरुषोत्तम नवगिरे (वय ३७, रा. जळकोट, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) तसेच त्यांच्या पतीचा विश्वास संपादन केला. त्यांना चांगल्या स्थितीतील जुनी ट्रॅव्हल्स बस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत वेळोवेळी १७ लाख ७१ हजार रुपये स्वीकारले.

मात्र, आरोपीने फिर्यादीला खराब अवस्थेतील, स्वतःच्या नावावर नसलेली आणि कागदपत्रे अपूर्ण असलेली ट्रॅव्हल्स बस दिली. संबंधित बसची कागदपत्रे लवकरच क्लिअर करून देतो, असे सांगून आरोपीने बसही परत नेली. त्यानंतर बसचे पैसे परत न देता तसेच कोणतीही योग्य बस न देता फिर्यादीची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी फिर्यादी उषा नवगिरे यांनी दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) व ३१६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments