अणदुर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी-Aanabhausathe Jyanti News Andur
अणदुर : तुळजापूर तालुक्यातील अणदुर दि,१ रोजी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र भैया कानडे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास साहेबराव घुगे, दीपक दादा घोडके, बाळकृष्ण घोडके, बालाजी घुगे, लक्ष्मण गायकवाड, महादेव बोराडे, अविनाश कांबळे, अमोल सगट, मोहन दनाने, आकाश कसबे, अण्णा गायकवाड, राजकुमार गायकवाड, भैय्या गायकवाड, दयानंद मुडके, प्रवीण घोडके, मारुती गायकवाड, बळी शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, सहादेव खंडागळे, लहू शिंदे, संतोष गवळी, शिवानंद गायकवाड, लक्ष्मण वाघमारे, तन्मय गायकवाड यांच्यासह समस्त समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि परिवर्तनवादी विचारांना उजाळा देत त्यांच्या कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा, असे प्रतिपादन केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



0 Comments