/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> आ.गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद द्यावे; मौजे इटकळ येथील ज्ञानेश्वर माशाळकर यांचे मुख्यमंत्र्यांना रक्तलिखित विनंतीपत्र.

Hot Posts

आ.गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद द्यावे; मौजे इटकळ येथील ज्ञानेश्वर माशाळकर यांचे मुख्यमंत्र्यांना रक्तलिखित विनंतीपत्र.

आ.गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद द्यावे; मौजे इटकळ येथील ज्ञानेश्वर माशाळकर यांचे मुख्यमंत्र्यांना रक्तलिखित विनंतीपत्र


---------------------------------------

इटकळ (प्रतिनिधी): तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळ येथील धनगर समाजाचे युवा कार्यकर्ते ज्ञानेश्वर रंगराव माशाळकर यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश करून त्यांना मंत्रिपदाची जबाबदारी द्यावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री यांना स्वतःच्या रक्ताने लिहिलेले विनंतीपत्र ई-मेलद्वारे पाठविले.ज्ञानेश्वर माशाळकर हे धनगर समाजाच्या विविध प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडत असून समाजहितासाठी सक्रियपणे कार्य करत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी रक्तलिखित पत्राद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी नोंदविल्याचे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजासह सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला असून समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष केला आहे. त्यांच्या कार्याचा, नेतृत्वाचा आणि जनभावनेचा विचार करून त्यांना मंत्रिमंडळात योग्य स्थान देण्यात यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे."ही केवळ एक मागणी नसून माझ्या आणि समाजाच्या भावना व्यक्त करणारे पत्र आहे. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घ्यावा," असेही माशाळकर यांनी पत्रात नमूद केले आहे.या अनोख्या रक्तलिखित विनंतीपत्राची परिसरात चर्चा रंगली असून त्यांच्या या कृतीकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. व धनगर समाज बांधवातून कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>