पहिल्याच प्रवेश फेरीत कुमारी विजयश्री अविनाश पाटील यांची एम.बी.बी.एस.साठी निवड.
------------------------------------------
मौजे इटकळच्या इतिहासातील पहिलीच कन्या डॉक्टर.
----------------------------------------
इटकळ ( दिनेश सलगरे):- मौजे इटकळ येथील कु. विजयश्री अविनाश पाटील हिने कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर वैद्यकीय क्षेत्रात दैदिप्यमान यश संपादन करत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा येथे एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी पहिल्याच प्रवेश फेरीत निवड मिळवली आहे. विशेष म्हणजे इटकळ गावाच्या इतिहासात एमबीबीएससाठी निवड होऊन डॉक्टर होण्याचा मान मिळवणारी ती पहिलीच कन्या ठरली असून, तिच्या या यशाने संपूर्ण गावाचा उर अभिमानाने भरून आला आहे.ग्रामीण भागातून उच्च शिक्षणाची वाट निवडत विजयश्रीने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर हे यश मिळवले. आई सौ. रेखा अविनाश पाटील आणि वडील अविनाश (दादा) पाटील यांनी मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेले अथक कष्ट, तिच्यावर ठेवलेला विश्वास आणि विजयश्रीने त्या विश्वासाला पात्र ठरत मिळवलेले हे यश अनेक पालक व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.वडील अविनाश दादा पाटील यांनी मुलीच्या गुणवत्तेची जाणीव ठेवून तिच्या शिक्षणासाठी सातत्याने मेहनत घेतली, तर विजयश्रीनेही जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सातत्य यांची सांगड घालत यशाला गवसणी घातली. आई-वडिलांचे डॉक्टर बनवण्याचे स्वप्न साकार करत तिने गावाचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे.वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवून समाजसेवेचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने विजयश्रीने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, इटकळ गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने कु. विजयश्री अविनाश पाटील हिचा विशेष नागरी सत्कार ही करण्यात येणार असून पत्रकार संघाचे अध्यक्ष रामभक्त दिनेश सलगरे यांनी विजयश्रीचे अभिनंदन करत तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


0 Comments