/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> गुरुवर्य के. टी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा उद्घाटन सोहळा व प्राथमिक फेरी उत्साहात संपन्न-KT Patil

Hot Posts

गुरुवर्य के. टी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा उद्घाटन सोहळा व प्राथमिक फेरी उत्साहात संपन्न-KT Patil

गुरुवर्य के. टी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा उद्घाटन सोहळा व प्राथमिक फेरी उत्साहात संपन्न-KT Patil 

प्राथमिक फेरीत ८० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग; अंतिम फेरीसाठी १६ स्पर्धकांची निवड

धाराशिव : आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव संचलित श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे संस्थापक तथा प्रेरणास्थान गुरुवर्य के. टी. पाटील (बप्पा) यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा २०२६ चा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आदित्य पाटील होते. प्रमुख व्याख्याते ॲड. अरुण चंद्रकांत गाढवे (विधिज्ञ, जिल्हा सत्र न्यायालय, भूम, धाराशिव) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून मा. श्रीमती सुप्रिया भालचंद्र गाढवे (जिल्हा क्रीडा अधिकारी, धाराशिव), सरचिटणीस मा. सौ. प्रेमाताई सुधीर पाटील, प्राचार्य एन. आर. नन्नवरे, उपप्राचार्य श्री. संतोष घार्गे, मा. श्री. अभिराम (भैय्या) पाटील, डॉ. तनया अभिराम पाटील, डॉ. मंजुळा आदित्य पाटील यांची उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमास श्री. व्ही. बी. पडवळ, संचालक पी. एल. गाडे, माजी शिक्षक श्री. अरुण बोबडे, डी. फार्मसीचे प्राचार्य श्री. देशमाने, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, माजी पर्यवेक्षक तानाजी हाजगुडे, पर्यवेक्षक कैलास कोरके, पर्यवेक्षक मोहनराव शिंदे, पर्यवेक्षक के. के. पाटील, पर्यवेक्षक कुमार निकम, सौ. विद्या देशमुख, जनता विद्यालय, येडशी तर परीक्षक म्हणून के. पी. पाटील व संदीप जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. स्वागतगीतानंतर उपप्राचार्य श्री. संतोष घार्गे यांनी प्रास्ताविकातून गुरुवर्य के. टी. पाटील (बप्पा) यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याविषयी माहिती दिली.

त्यानंतर प्रमुख व्याख्याते ॲड. अरुण चंद्रकांत गाढवे यांनी प्रभावी व्याख्यानातून गुरुवर्य के. टी. पाटील (बप्पा) यांचा संघर्षमय व प्रेरणादायी जीवनपट उलगडून सांगितला.

या अध्यक्षीय भाषणात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आदित्य पाटील यांनी गुरुवर्य के. टी. पाटील (बप्पा) यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या प्राथमिक फेरीस प्रारंभ झाला. जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांतील ८० हून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धकांनी ‘धाराशिवच्या शैक्षणिक क्षेत्रातील शिल्पकार तथा गुरुवर्य के. टी. पाटील (बप्पा) यांचे योगदान’, ‘सोशल मीडिया : जोडलेले जग व हरवलेली नाती’, ‘पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकास : आजची गरज, उद्याचे भविष्य’, ‘डिजिटल युग आणि सायबर सुरक्षेचे आव्हान : आजच्या तरुणांची जबाबदारी’ तसेच ‘नैतिक मूल्ये, संस्कार आणि आजचा आधुनिक समाज’ अशा विविध विषयावर आपले प्रभावी विचार मांडले.

प्राथमिक फेरीतील उत्कृष्ट सादरीकरणाच्या आधारे १६ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. अंतिम फेरी शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी होणार असून निवड झालेले स्पर्धक अंतिम विजेतेपदासाठी आपले वक्तृत्व कौशल्य सादर करणार आहेत.

स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांक ₹१५,०००, द्वितीय क्रमांक ₹११,०००, तृतीय क्रमांक ₹७,०००, तर उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना प्रत्येकी ₹२,००० अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. यासोबतच विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने केले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थी आणि जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दत्तात्रय जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. डी. वाय. घोडके यांनी मानले. या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष सुधीर आण्णा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>