/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> नळदुर्ग किल्ला प्रकरणाला नवे वळण; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा

Hot Posts

नळदुर्ग किल्ला प्रकरणाला नवे वळण; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा

 

नळदुर्ग किल्ला प्रकरणाला नवे वळण; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा

हुंड्याच्या मागणीवरून अश्विनीला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा वडिलांचा आरोप; एका जुळ्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

धाराशिव, प्रतिनिधी : नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात ३ सप्टेंबर रोजी अश्विनी मनोहर पौळ यांनी आपल्या तीन मुलांसह टोकाचे पाऊल उचलल्याच्या धक्कादायक घटनेला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणी अश्विनीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती, सासू, सासरे आणि आत्त्यासासू अशा चौघांविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत अश्विनी पौळ आणि तिचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर अश्विनीच्या दोन जुळ्या मुली वीरा आणि क्रांती गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यापैकी क्रांती हिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला असून, वीरा हिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अश्विनीचे वडील तानाजी शिवाजी मोहिते यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, अश्विनीचा पती मनोहर अंकुश पौळ, सासरे अंकुश पंढरीनाथ पौळ, सासू कालिंदा अंकुश पौळ आणि आत्त्यासासू विमलबाई यांनी हुंड्याच्या मागणीवरून अश्विनीला वारंवार मानसिक तसेच शारीरिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सोन्याच्या पाटल्या आणि रिक्षेसाठी पैशांची मागणी

अश्विनीने माहेरून सोन्याच्या पाटल्या तसेच रिक्षा घेण्यासाठी पैसे आणावेत, अशी मागणी तिच्या सासरच्या मंडळींकडून केली जात असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या मागणीवरून तिला मारहाण करून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

सततच्या या त्रासाला कंटाळूनच अश्विनीने आपल्या तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यात टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या वडिलांनी फिर्यादीत केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

चौघांविरुद्ध बीएनएसनुसार गुन्हा

या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिसांनी मनोहर अंकुश पौळ, अंकुश पंढरीनाथ पौळ, कालिंदा अंकुश पौळ आणि विमलबाई यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ४२९/२०२६ दाखल केला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम ८०, १०८, ८५ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रविंद्र गायकवाड करीत आहेत. तपासादरम्यान घटनेमागील नेमके कारण, हुंड्याच्या मागणीसंदर्भातील आरोप तसेच अश्विनीला झालेल्या कथित त्रासाबाबत पोलिसांकडून अधिक माहिती व पुरावे तपासले जाणार आहेत.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>