/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> 15 व्या च्या निधीत 14.13 लाखांचा अपहार केल्याचा आरोप; तत्कालीन सरपंचासह ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Hot Posts

15 व्या च्या निधीत 14.13 लाखांचा अपहार केल्याचा आरोप; तत्कालीन सरपंचासह ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

15 व्या च्या निधीत 14.13 लाखांचा अपहार केल्याचा आरोप; तत्कालीन सरपंचासह ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

शेळका धानोरा ग्रामपंचायतीतील प्रकरण; नालीकाम, सीसीटीव्ही, साहित्य खरेदीसह विविध कामांवरील खर्चाबाबत अनियमिततेचा आरोप

कळंब, प्रतिनिधी : धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शेळका धानोरा ग्रामपंचायतीमध्ये 15 व्या वित्त आयोगाच्या निधीच्या विनियोगासंदर्भात कथित अनियमितता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विविध विकासकामे आणि साहित्य खरेदीवर खर्च दाखवून तब्बल 14 लाख 13 हजार 163 रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून तत्कालीन सरपंच सुवर्णा सुधाकर इंगळे आणि तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी सुरेश तुकाराम धावारे यांच्याविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पंचायत समिती कळंबच्या सहायक गटविकास अधिकारी मनिषा वसंतराव सुकाळे यांनी 28 ऑक्टोबर 2026 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 316(4) आणि 3(5) अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.

विविध कामांवर खर्च दाखवल्याचा आरोप

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, तत्कालीन सरपंच सुवर्णा सुधाकर इंगळे आणि तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी सुरेश तुकाराम धावारे यांनी संगनमत करून 6 जून 2023 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 7 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत शेळका धानोरा ग्रामपंचायत कार्यालयात 15 व्या वित्त आयोगाच्या निधीशी संबंधित व्यवहारांमध्ये अनियमितता केल्याचा आरोप आहे.

ग्रामपंचायतीमध्ये साहित्य खरेदी, नालीसंदर्भातील कामे, नालीतील गाळ काढणे, सीसीटीव्ही बसविण्याचे काम तसेच शेतकरी सहलीच्या कामावर खर्च दाखविण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या कामांशी संबंधित 14 लाख 13 हजार 163 रुपयांचा विनियोग सादर न करता निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप संबंधित दोघांवर करण्यात आला आहे.

सहायक गटविकास अधिकाऱ्यांची फिर्याद

या कथित आर्थिक अनियमिततेप्रकरणी पंचायत समिती कळंबच्या सहायक गटविकास अधिकारी मनिषा वसंतराव सुकाळे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीच्या आधारे कळंब पोलिसांनी संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

तपासानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होणार

ग्रामपंचायतीच्या निधीचा विनियोग, विविध कामांवरील खर्च आणि संबंधित आर्थिक व्यवहार याबाबत या प्रकरणात आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांची सत्यता, निधीच्या वापराबाबतची कागदपत्रे आणि संबंधितांची भूमिका याबाबत पोलीस तपासातून वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.


Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>