/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> धाराशिव :श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये शासकीय रेखाकला परीक्षा संपन्न!

Hot Posts

धाराशिव :श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये शासकीय रेखाकला परीक्षा संपन्न!

धाराशिव :श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये शासकीय रेखाकला परीक्षा संपन्न!



धाराशिव : येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये शासकीय रेखाकला परीक्षेचे केंद्र निश्चित करण्यात आले होते. दि. २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत शासकीय रेखाकला परीक्षा विविध विषयांच्या नियोजित वेळापत्रकानुसार सुरळीतपणे पार पडली. परीक्षेचे काटेकोर नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आवश्यक सुविधा यामुळे परीक्षा यशस्वीरीत्या संपन्न झाली.

या परीक्षा केंद्राला कलानिकेतन, बीडचे प्राचार्य प्रवीण मुखेरकर यांनी भेट देऊन परीक्षा केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी परीक्षा आयोजन, नियोजन, बैठक व्यवस्था, विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच परीक्षेच्या एकूण व्यवस्थेची माहिती घेतली. केंद्रावरील शिस्तबद्ध वातावरण व नियोजनबद्ध परीक्षा प्रक्रिया पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

या परीक्षेच्या यशस्वी आयोजनामध्ये कलाध्यापक शिवाजी भोसले यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पडत असल्याचे परीक्षा विभागातील सदस्यांनी भेटीदरम्यान नमूद केले. परीक्षा काळात आवश्यक त्या सर्व बाबींची योग्य ती दक्षता घेण्यात आली.

यावेळी प्रशालेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख नंदकुमार नन्नवरे, केंद्र संचालक एस. डी. भोसले व डी. ए. देशमुख तसेच इयत्ता आठवीचे पर्यवेक्षक कुमार निकम उपस्थित होते. प्रशालेच्या वतीने मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व ‘शिष्यमेरु’ पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

शासकीय रेखाकला परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असून त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळत आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध कलाविषयांमध्ये आपले कौशल्य प्रदर्शित केले.

ही परीक्षा यशस्वी होण्यासाठी संस्थाध्यक्ष सुधीर अण्णा पाटील, सरचिटणीस प्रेमाताई पाटील, सीईओ आदित्य पाटील, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे आदींचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>