/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> गोवंशाची दाटीवाटीने वाहतूक; तीन वाहनांसह ९ गोवंश ताब्यात

Hot Posts

गोवंशाची दाटीवाटीने वाहतूक; तीन वाहनांसह ९ गोवंश ताब्यात

गोवंशाची दाटीवाटीने वाहतूक; तीन वाहनांसह ९ गोवंश ताब्यात


सांगवी पाटी येथे पोलिसांची कारवाई; सुमारे ९ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

तुळजापूर (प्रतिनिधी) : गोवंशीय जनावरांची कोणतीही चारापाण्याची व्यवस्था न करता त्यांना दाटीवाटीने वाहनांमध्ये भरून वाहतूक केल्याप्रकरणी तामलवाडी पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील सांगवी पाटी येथे करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बालाजी नारायण बनसोडे (वय ३२, रा. उळेवाडी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) हा तीन वाहनांमधून गोवंशीय जनावरांची वाहतूक करताना आढळून आला. यामध्ये पिकअप वाहन क्रमांक एमएच २५ एजे ०३९४ मध्ये तीन गायी, महिंद्रा जितो प्लस वाहन क्रमांक एमएच १३ डी क्यू ७२६५ मध्ये तीन गायी व एक बैल, तर महिंद्रा अशोक लेलँड वाहन क्रमांक एमएच १३ सीयू १०४५ मध्ये दोन गायी व एक वासरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

एकूण नऊ गोवंशीय जनावरे कोणत्याही चारापाण्याची व्यवस्था न करता वाहनांमध्ये दाटीवाटीने भरून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. या गोवंशीय जनावरांची किंमत सुमारे ९ लाख ७४ हजार रुपये, तर वाहनांची किंमत सुमारे १ लाख २४ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

उमरगा पोलीस ठाण्याच्या पथकाने ही वाहतूक पकडल्यानंतर संबंधित व्यक्तीविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(१)(डी), ११(ई) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी तीनही वाहने व गोवंशीय जनावरे ताब्यात घेत पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>