/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> शिंदीत गुंगीकारक औषध मिसळल्याचा आरोप; २५ वर्षीय तरुणाच्या मृत्यूप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल-Breaking News

Hot Posts

शिंदीत गुंगीकारक औषध मिसळल्याचा आरोप; २५ वर्षीय तरुणाच्या मृत्यूप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल-Breaking News

अणदुर:  शिंदीत गुंगीकारक औषध मिसळल्याचा आरोप; २५ वर्षीय तरुणाच्या मृत्यूप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल-Breaking News

धाराशिव  : -प्रतिनिधी :- तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील बेकायदेशीर शिंदी विक्रीच्या ठिकाणी शिंदी पिल्यानंतर २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. शिंदीमध्ये जास्त प्रमाणात गुंगीकारक औषध मिसळल्यामुळे तरुणाला चक्कर येऊन तो बेशुद्ध पडला आणि त्याचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी एका महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ आणि १२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ईश्वर कल्लेमुळे यांचा मृत्यू

ईश्वर बाबू कल्लेमुळे (वय २५, रा. मुळज रोड, उमरगा) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास ईश्वर कल्लेमुळे आणि गोविंद तुळशीराम विभुते हे दोघे प्रतिक्षा दयानंद भोसले (रा. वत्सलानगर, अणदूर, ता. तुळजापूर) यांच्या कथित बेकायदेशीर शिंदी विक्रीच्या ठिकाणी शिंदी पिण्यासाठी गेले होते.

यावेळी ईश्वर यांनी शिंदी प्राशन केल्यानंतर त्यांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडले. शिंदीमध्ये जास्त प्रमाणात गुंगीकारक औषध मिसळण्यात आल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. या घटनेत ईश्वर यांचा मृत्यू झाला.

वडिलांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल

या घटनेची नळदुर्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासात निष्पन्न झालेल्या बाबींच्या आधारे मृत ईश्वर यांचे वडील बाबू लक्ष्मण कल्लमुळे (वय ५२, रा. भारतनगर, मुळज रोड, उमरगा) यांनी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलिसांत फिर्याद दिली.

या फिर्यादीवरून प्रतिक्षा दयानंद भोसले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०५ आणि १२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमारे वर्षभरापूर्वी घडलेल्या या घटनेप्रकरणी आता गुन्हा नोंदवण्यात आल्याने परिसरात चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत. आरोपांबाबतचा अंतिम निष्कर्ष तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होईल.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>