/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> मानसिक छळ; विषारी औषध प्राशन करून १९ वर्षीय निशाचा मृत्यू, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल-Crime News

Hot Posts

मानसिक छळ; विषारी औषध प्राशन करून १९ वर्षीय निशाचा मृत्यू, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल-Crime News

मानसिक छळ; विषारी औषध प्राशन करून १९ वर्षीय निशाचा मृत्यू, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल-Crime News


धाराशिव : लग्नाचे आश्वासन देऊन नंतर लग्नास नकार देणे तसेच फोनवरून अपमानास्पद बोलून मानसिक त्रास दिल्याने एका १९ वर्षीय तरुणीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात एका तरुणासह त्याच्या चुलती आणि बहिणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निशा बाबासाहेब भिसे (वय १९, रा. लोहटा पूर्व, ता. कळंब, जि. धाराशिव) हिने दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास लोहटा पूर्व येथे विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना दि. ८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८.४५ वाजता ससून रुग्णालय, लातूर येथे तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मयत निशाची आई मीरा बाबासाहेब भिसे (वय ३९, रा. लोहटा पूर्व, ता. कळंब) यांनी दि. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, शिवचरण दिगंबर भारती (वय २५, रा. दिग्रस, ता. कंधार, जि. नांदेड) याने निशाला लग्नाचे आश्वासन दिले होते. मात्र, नंतर लग्नास नकार देत त्याने फोनवरून तिच्याशी अपमानास्पद बोलून तिला मानसिक त्रास दिला. तसेच शिवचरणची चुलती अश्विनी भारती आणि बहीण कौशल्या यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या त्रासाला कंटाळून निशाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून शिराढोण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ३५१ आणि ३(५) अन्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेमुळे लोहटा पूर्व परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणाचा पुढील तपास शिराढोण पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>