![]() |
चिवरी येथे निसर्गाच्या सानिध्यात असलेले महालक्ष्मी मंदिर |
नवसाला पावणारी चिवरीची महालक्ष्मी ,नवराञमहोत्सव विशेष
तुळजापूर:: शाक्त संप्रदायाचा सर्वात जास्त प्रभाव असलेला जिल्हा म्हणजे उस्मानाबाद जिल्हा होय . या जिल्ह्यातील बालाघाटाच्या डोंगर दऱ्यात अनेक देवी मंदिरे व ठाणी पाहायला मिळतात. यातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान व नवसाला पावणारी देवी म्हणून तुळजापूर तालुक्यातील चिवरी महालक्ष्मी देविस ओळखले जाते .
नळदुर्ग पासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर बालाघाटच्या पायथ्याला निसर्गाच्या सानिध्यात चिवरीच्या महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. येथील सर्वात मोठी यात्रा माघ पौर्णिमेनंतर च्या पहिल्या मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, तसेच चिवरी च्या वेशीपासून मंदिरापर्यंत पालखीची छबिना मिरवणूक काढली जाते. यात हलगी संबळच्या निनादात आराधनी, पोतराज,जान्या व भाविक सामील झालेले असतात. ही मिरवणूक मंदिरात आल्यानंतर तिथे देवीचा अभिषेक करून विधिवत अलंकार पूजा करून पुरणपोळीचा व आंबट गोड भाताचा नैवेद्य दाखविला जातो. यात्रेच्या दिवशी सकाळी विविध धार्मिक विधी पार पडतो, हा वर्षातील मुख्य दिवस असतो, यात्रेच्या दिवशी नवीन पोतराजानां दीक्षा देणे, लहान मुलाचे जावळ काढणे, पट बांधणे, नवस्फूर्ती करणे, आधी विधि यावेळी केली जाते.
नवरात्र महोत्सवातच नव्हे तर वर्षभर या ठिकाणी भाविक गर्दी करतात. आंध्रप्रदेश , कर्नाटकातील व महाराष्ट्रासह पर राज्यातील देवी भक्त येथे मोठ्या भक्तिभावाने येतात. विशेषता पारधी समाज यात्रेमध्ये मोठ्याा संख्येने दाखल होतात . हेमाडपंथी असलेले या मंदिराची पुनर्बांधणी केलेली आहे. मंदिराच्या शेजारी बारव असून देवी मूर्ती रूपात पुजली जाते. देवीचे स्नानगृह जवळील उंच टेकडीवर आहे.येथील धार्मिक विधीकरता विविध समाजाचे अठरापगड जातीचे मानकरी आहेत.
नवरात्रात येथे पंचक्रोशीतून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. चिवरीची महालक्ष्मी कोकणातील असून मुंगी पैठणी येथून राम डोहात नाहून एकनााथ महाराजांच्या कडून साडीी चोळीचा मान घेऊन वरखेड येथे ठाण मांडली आणि नंतर वरखेड मार्गे तुळजापूर येथे आई तुळजाभवानीी मातीचे आशीर्वाद घेऊन चिवरीच्या डोंगरात आली , भर उन्हाळ्याचे दिवसांमध्ये देवी वेडी म्हातारीच्याा रूपामध्ये डोंगरात येऊन डोंगरावर जनावरेे राखत असलेल्या मुलांना विनवणी करू लागली की मला मला भूक लागली आहे थोडी भाकर आणि पाणी मिळेल का? अशी विचारणा करू लागली यावेळी त्या मुलांनी आमचे आत्ताच जेवण झाले आजी काही वेळापूर्वी आला असता भाकर दिली असते अशीी मुलांनी बोलले यावर म्हातारीने जेवणासाठी मुलांकडेे हट्ट धरला आणि मोठ्याा दगडावर बसूून राहिली माञ त्यातील एका दयाळू गुरे चारणाऱ्या मुलाने गावातून भाकर आणून दिली , थोड्याच वेळात म्हातारीने मुलांना पाणी मागितले त्यावर सर्व मुलांनी आम्हालाच पाणी मिळत नाही तुला कुठली देऊ असे उद्गार काढले यावेळी दगडावर बसलेल्या म्हातारीने मुलांना बोट दाखवून पाणी दाखवले आणि मुले जमिनीतून येणाऱ्या पाण्याच्या धाराकडे पाहू लागले आणि म्हातारी त्या दगडावरून अदृश्य झाले. अशी देवीची आख्यायिका आहे.
आजही देवीच्या मागील बारव मध्ये अवर्षण काळातही पाणी तग धरून राहते, प्राचीन रूढी परंपरेचा वारसा सांगणारी चिवरी ची महालक्ष्मी व येथील निसर्ग सौंदर्य बघण्यासारखा आहे. मागील दोन वर्षापासून सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने नवरात्र महोत्सव साजरा करता आला नाही, परंतु यंदा निर्बंध मुक्त नवरात्र महोत्सव साजरा करता येणार असल्याने भाविकांमध्येेेे प्रचंड उत्साह दिसून येत आहे .
शब्दसंकलन: राजगुरु साखरे
0 Comments