बालाघाट न्युज टाइम्स

Hot Posts

6/recent/ticker-posts

नवरात्रीच्या पाचव्या माळेला चिवरी येथील महालक्ष्मीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, निर्बंध मुक्त नवरात्र उत्सवामुळे  भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण


चिवरी:  तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथील जाग्रतदेवस्थान श्री महालक्ष्मी मातेच्या  नवरात्र  महोत्सवानिमित्त भावीकांची मोठी गर्दी होत आहे. नळदुर्ग पासून अवघ्या नऊकिलोमीटर अंतरावर बालाघाटाच्या पायाथ्याला निसर्गाच्या सानिध्यात चिवरी महालक्ष्मीचे मंदिर आहे. आज नवरात्रीच्या पाचव्या माळीला शेकडो भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या . या दिवशी देवीच्या स्नानगृहावर पुढील वर्षाची भाकणूक ठरवली जाते, याावेळी पोतराज आराधी जान्या यांचा मोठा सहभाग असतो  भावीक नवस्फूर्तीसाठी मंदिरामध्ये नऊ दिवस आरास बसतात .  तसेच मंदिरामध्ये भावीकांकडुन नवरात्रीचा उपवास करणाऱ्या भावीकांना शाबु खिचडी फराळाचे वाटप करण्यात येते. मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या सावटामुळे नवरात्र महोत्सव साजरा करता आला नव्हता त्यामुळे यंदा भाविकांमधून मोठा उत्सााह दिसून येत होता सकाळी  सहा वाजल्यापासुन मंदीर परीसर आई राजा,उदो ऊदो चिवरी आईचा चांगभल च्या जयघोषाने परिसर दुमदुमुन गेला होता. 



Show quoted text

Post a Comment

0 Comments