चिवरी येथील महालक्ष्मी मातेचा सिमोल्लंघन सोहळा उत्साहात साजरा
तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी मातेचा सीमोल्लंघन सोहळा बुधबार (दि.५) रोजी मोठ्या थाटात पार पडला. मंदिरापासून गावापर्यंत देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली, हलगी, झांज, संबळ ,ढोल ,ताशाच्या गजरात आई राजा उदो उदो च्या गजरात परिसर दुमदुमून गेला होता. देवीजींच्या छबिना समोर पोतराज गीते, पोत खेळणे, आराधी गीते, धनगरी ओव्या आदी कार्यक्रम घेण्यात आले, भाविक आपल्या नवसपूर्तीसाठी पालखीला पाणी घालण्याची प्रथा आहे. तसेच गावांमध्ये सर्व लोक एकमेकांना आपट्याची पाने देऊन आलिंगन देतात, यानंतर पालखी मानाच्या पुजाऱ्याच्या घरी मार्गस्थ होते, यावेळी ग्रामस्थांनी आई राजा उदो उदो चा जयघोषात परिसर दुमदुमून गेला होता. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी देवीचे पुजारी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
0 Comments