तुळजापूर/बालाघाट न्युज टाइम्स: राजकारणाची पहिली पायरी म्हणून ग्रामपंचायत निवडणूकडे पाहिली जाते, सरपंच पद मिळवण्यासाठी गावोगावी चुरशीच्या निवडणुका होतात आता नवनिर्वाचित सरकारने सरपंच पद थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयामुळे भावी सरपंच व भावी नगराध्यक्ष यांचे राजकीय वजन वाढणार असून जनतेशी प्रामाणिक व स्वच्छ प्रतिमेचे चेहरे शोधताना पॅनल प्रमुखांचा तसेच राजकीय पक्षांचा कस लागणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील युती सरकारच्या काळात नगराध्यक्ष व सरपंच जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला होता.
महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द करून या निवडी सदस्यांमधून पारित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्यातील नवनिर्वाचित सरकारने पुन्हा सरपंच व नगराध्यक्ष पद जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला आहे या सरपंच निवड थेट जनतेतून होणार असल्याने काही इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे, थेट निधी मिळत असल्याने आणि सदस्यांमधून सरपंच पदाची संधी मिळेल अशी आशा बाळगून बसणाऱ्या इच्छुकांना या निर्णयामुळे मोठा फटका बसला आहे. यापूर्वी सरपंच पद आरक्षित असेल त्या प्रवर्गाचे अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात बघायला मिळायचे, सरपंच पदासाठी मोठी स्पर्धा असायची बहुमत मिळाल्यास सरपंच आपलाच करण्यासाठी निवडणुका चुरशीने व्हायच्या. मात्र नव्या निर्णयामुळे सदस्याचे महत्त्व कमी झाले असुन आगामी होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पूर्वतयारी करणाऱ्या इच्छुकामध्ये निर्णय बदलामुळे कही कुशी कही गम असे चित्र पाहण्यास मिळत आहे
0 Comments