Hot Posts

6/recent/ticker-posts

उद्या ऐतिहासिक आग्रा किल्ल्यामध्ये निनादणार शिवरायांचा जयघोष ! ' दिवान- ए - आम 'मध्ये होणार प्रथमच शिवजयंती साजरी


उस्मानाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांचा आग्रा किल्ल्यावरील कर्तबगारीचा  इतिहास लक्षात घेता शिवप्रेमींनी यंदाची शिवजयंती आग्रा किल्ल्यामध्ये साजरी करण्याचा निर्णय घेतला , सुरुवातीला पुरातत्व खात्याने परवानगी नाकारल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतर 
महाराष्ट्र सरकार आणि अजिंक्य देवगिरी फाऊंडेशनने आग्रा  किल्ल्यावर शिवजयंतील साजरी करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यानंतर आता पुरातत्व खात्यानं अखेर शिवजयंतीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. आग्रा किल्ल्यातील 'दिवाण-ए-आम’मध्ये शिवजयंती साजरी केली जाणार आहे.या सर्व घडामोडीनंतर आग्रा किल्ल्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.  या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

साडेतीनशे वर्षांपूर्वी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा भेटीत बोलावून त्यांचा भरदरबारात अपमान केला होता. त्यानंतर शिवरायांना औरंगजेबानं कैदेत ठेवलं होतं. याशिवाय छत्रपती संभाजी महाराजांनाही औरंगजेबानं आग्र्यातच नजर कैदेत ठेवलं होतं. शिवरायांनी मोठ्या शिताफीनं औरंगजेबाच्या हातावर तुरी देत सुटका केली होती. त्यामुळं महाराष्ट्राच्या इतिहासात आग्र्याच्या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.त्यामुळे या किल्ल्यामध्ये शिवजयंतीचा भव्य सोहळा साजरा व्हावा अशी अनेक शिवप्रेमींची इच्छा होती, ती आता पूर्ण होत आहे. त्यामुळे केवळ राज्यातच नव्हे तर देशभरातील शिवप्रेमींमधुन आनंद व्यक्त केला जात आहे.  


Post a Comment

0 Comments