![]() |
येथील शिवछत्रपती तरुण मंडळाने शिवरायांची केलेली मूर्ती प्रतिष्ठा |
चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे दि, १९ रोजी विविध ठिकाणी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती उत्साहात साजरा करण्यात आली , यावेळी प्रारंभी शिवछत्रपती तरुण मंडळाच्या वतीने हनुमान चौकामध्ये शिवरायांची मूर्ती प्रतिष्ठापना करून मान्यवरांच्या हस्ते पूजन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,यावेळी विकास सोसायटीचे चेअरमन बालाजी शिंदे, ग्रा.पं सदस्य बालाजी पाटील , अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नेताजी शिंदे, शहाजी येवते,गिरजाप्पा झांबरे,अतुल जाधव, सोमा शिंदे, राम शिंदे,नागनाथ किल्लेदार,मनोज आरगे, प्रशांत शिंदे,पांडुरंग जाधव, किरण झांबरे , राजेंद्र येवते , अजित झांबरे ,सिताराम शिंदे आदीसह शिवप्रेमी,महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत.
![]() |
दत्तू पाटील अण्णा माध्यमिक विद्यालय चिवरी. |
याचबरोबर येथील दत्तू पाटील अण्णा माध्यमिक विद्यालयमध्ये शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका एल.के .बिराजदार, सहशिक्षक एस.बी.शिंदे ,शहाजी मस्के,एस.एम.शिंदे, एस.ए.ढगे, के.पी.ठाकुर सूर्यवंशी के. एस, बी.बी.शिंदे, आदीसह विद्यार्थी उपस्थित होत.
![]() |
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिवरी. |
तसेच येथील जि.प. शाळेमध्ये मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,यावेळी मुख्याध्यापक राजकुमार महैञे, सहशिक्षक अण्णासाहेब भोंग, मोहन राजगुरू , राहुल मसलेकर, शालेय समिती अध्यक्ष शञुघ्न बिराजदार,उपसरपंच लबडे आदीसह विद्यार्थी , ग्रामस्थ शिवप्रेमीं मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत कार्यालय चिवरी येथे शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
![]() |
ग्रामपंचायत कार्यालय चिवरी |
0 Comments