तुळजापुर: तुळजापूर तालुक्यातील बारूळ येथे महाशिवरात्री यात्रा उत्सवानिमित्त श्री बाळेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने बारूळ महोत्सवाचे दि,२० ते २१ फेब्रुवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत. या बारूळ महोत्सवाचे सोमवारी दि,२० रोजी उद्घाटन होणार आहे, या महोत्सवामध्ये राज्यभरातील अनेक स्पर्धक सहभाग नोंदवणार आहेत. बारूळ महोत्सवाचे हे ११ वे वर्ष असून याचे उद्घाटन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या हस्ते होणार आहे. आजच्या दिवशी खुली लावणी, बालगट आणि प्रौढ गट या वैयक्तिक स्पर्धा सादर होणार आहेत. त्याचबरोबर दि,२१ रोजी समूह गट खुला आणि पहिल्या दिवशी निवड झालेल्या गटाची अंतिम फेरी असा शानदार कार्यक्रम होणार आहे. या महोत्सवामध्ये १ लाख ५१ हजारांचे पारितोषिके असणार आहेत.
मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध असल्यामुळे येथील महोत्सव झाला नव्हता यंदा मात्र निर्बंध मुक्त महोत्सव होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे, तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध गायक श्रमिक पोतदार हे करणार आहेत, या महोत्सवासाठी ग्रामस्थ व बाळेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.
0 Comments